sahyadri sakal
कोकण

बांधिलकी : बचावकार्यात अग्रेसर असणारे सह्याद्री मित्र

१९९४ मध्ये ‘सह्याद्री मित्र’ ही गिरिभ्रमण क्रीडा संस्था स्थापन केली.

सकाळ वृत्तसेवा

महाडमधील ‘सह्याद्री मित्र’ या संस्थेकडून गिर्यारोहणाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांमध्ये साहस आणि निसर्गाप्रती प्रेम वाढावे यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. रायगड जिल्ह्यात व इतर ठिकाणी झालेल्या अनेक दुर्घटनांमध्ये बचावकार्य करण्याचे कामही या संस्थेने पार पाडले आहे.

गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या महाड शहरातील डॉ. राहुल वारंगे, डॉ. विकास नगरकर, संतोष मौर्य, जयेश शेंडे, राजू उभारे आणि सहकाऱ्यांनी एकत्र येत १९९४ मध्ये ‘सह्याद्री मित्र’ ही गिरिभ्रमण क्रीडा संस्था स्थापन केली. २७ वर्षांनंतरही तितक्याच तडफेने काम सुरू आहे. पर्यावरणाचा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आल्यानंतर गिर्यारोहण या विषयादेखील अभ्यासक्रमात समावेश असावा यासाठी या संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

लहान मुलांना निसर्ग उमजला पाहिजे.

आपल्या परिसरात असलेले गड-किल्ल्यांचे ज्ञान त्यांना झाले पाहिजे. साहसी वृत्ती वाढीस लागली पाहिजे, यादृष्टीने सह्याद्री मित्राचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांसाठी पावसाळी भटकंती आयोजित केली जाते. विविध शाळांमधून ‘स्लाईड शो’द्वारे निसर्गाचे महत्त्व मुलांना पटवून दिले जाते. निसर्ग वाचन शिबिरे, किल्ले भटकंती आणि याचबरोबर किल्ल्यांची स्वच्छता असे उपक्रम राबवण्यात येतात. मुलांप्रमाणे महिलांनाही गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी यासाठी २००७ ते २०२० दरवर्षी जगातील महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या अपरिचित दुर्गांवर महिलांची दुर्गभ्रमंती करण्यात आली आहे. यात शेकडो महिला सहभागी होत असतात.

माणगाव तालुक्यातील किल्ले कुर्डुगड या प्राचीन किल्ल्यावरील एक गुहा समूह सह्याद्री मित्र महाड व कोकण इतिहास परिषद रायगड शाखा यांनी एकत्रित केलेल्या मोहिमेत शोधून इतिहासातील एक नवीन पान उलगडले. टकमक टोकावरून रॅपलिंग करण्याचा पहिला उपक्रम संस्थेने यशस्वी केला. दुर्घटनेतील जखमींना मदत करण्यासाठीही ते पुढाकार घेतात.

- सुनील पाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT