Hindu Rashtra Sanatana Dharma Constitution esakal
कोकण

Indian Constitution : 'संविधानाद्वारे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा'; हिंदू जनजागृती अधिवेशनात मोठी मागणी

संविधानाद्वारे भारताला हिंदू घोषित केल्याविना आजच्या स्थितीत भारताला हिंदू राष्ट्र म्हणता येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

भावनात्मक विचार करण्यापेक्षा संविधानिक हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) घोषित होण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

चिपळूण : भारत हे स्वयंभू हिंदू राष्ट्र आहे, तरी विद्यमान संविधानिक व्यवस्थेत त्याला हिंदू राष्ट्र म्हणून दर्जा कुठे आहे? त्यामुळे संविधानाद्वारे भारताला हिंदू घोषित केल्याविना आजच्या स्थितीत भारताला हिंदू राष्ट्र म्हणता येणार नाही. त्यामुळे भावनात्मक विचार करण्यापेक्षा संविधानिक हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) घोषित होण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सनातनचे (Sanatana Dharma) चेतन राजहंस (Chetan Rajhans) यांनी केले.

हिंदू जनजागृती समितीच्यावतीने शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय हिंदू-राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी साधनेचे महत्त्व या विषयावर सत्यवान कदम यांनी मार्गदर्शन केले. धर्मशिक्षणासाठी मंदिर विश्वस्तांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे विचार श्री देव भार्गवराम परशुराम विश्‍वस्त अभय महाराज यांनी व्यक्त केले.

Sanatana Dharma

अधिवेशनाला विविध संघटना, संप्रदाय, व्यावसायिक, राजकीय पक्षाचे १२० प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनाचा उद्देश हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर यांनी मांडला. आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थानचे विश्वस्त स्वप्नील भिडे, चिपळूण मनसे शहराध्यक्ष अभिनव भुरण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे गणेश गायकवाड, अधिवक्ता सचिन रेमणे, मिलिंद तांबे, टेरवच्या श्री भवानी वाघजाई देवस्थान अध्यक्ष चंद्रकांत कदम, राजापूरच्या हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान महेश मयेकर, डॉ. धर्मश्री शेवाळे यांनी आपले अनुभव कथन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT