Sangmeshwar Kolhapur Road Construction Work Starts 
कोकण

लाॅकडाउन पण 'या' राज्यमार्गाचे काम सुरू 

सकाळवृत्तसेवा

संगमेश्वर ( रत्नागिरी ) - जनता कर्फ्यूपासून संगमेश्वर-कोल्हापूर या राज्यमार्गाचे काम लोवले मयुरबाग येथपर्यंत येऊन थांबले होते; मात्र राज्य शासनाने पावसाळ्यापूर्वी आवश्‍यक शासकीय बांधकामे पूर्ण करण्यास परवानगी दिल्याने ठेकेदाराने योग्य ती खबरदारी घेत लोवले ते मयुरबागपर्यंतचे काम सुरू केले असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

संगमेश्वर-कोल्हापूर राज्यमार्गाचे काम साधारण दोन वर्षांपूर्वी सुरू झाले. या 32 किमीच्या मार्गासाठी 32 कोटींचा निधी राज्यशासनाने मंजूर केला होता; मात्र या कामात काहीना काही अडथळे येत गेल्याने हे काम रखडले होते. अखेरीस 4 डिसेंबर 2019 रोजी साखरपापासून रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. काम पूर्ण करत ठेकेदार लोवले

मयुरबागपर्यंत आला होता. लोवले ते संगमेश्वर हे केवळ तीन किमीचे काम बाकी राहिले होते. 22 मार्चला जनता कर्फ्यू आणि त्यानंतर पूर्ण लॉकडाऊन झाले आणि हे काम पूर्णत: बंद पडले. 32 किमींपैकी 29 किमीचे काम झाले. लोवले संगमेश्वर हे अखेरच्या टप्प्याचे काम रखडले. तब्बल एक महिना काम रखडल्याने कामगार वर्ग, ठेकेदार, वाहनचालक, पादचारी, ग्रामस्थ सर्वच त्रस्त झाले होते. 

पावसाळ्यापूर्वीची अपूर्ण शासकीय बांधकामे पूर्ण करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर ठेकेदारांनी रखडलेल्या या रस्ता कामाला प्राधान्य दिले आहे. रस्ता काम करताना सर्व कामगारांना मास्क देण्यात आले असून सोशल डिस्टंसिंग पाळण्याची देखील खबरदारी घेतली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता भारती या कामावर लक्ष ठेवून आहेत. येत्या आठवडाभरात हे रस्ता काम पूर्णत्वास जाईल असा विश्वास ठेकेदारांनी व्यक्त केला आहे. या रस्त्यावर असणारे कार्पेट कोटिंग मात्र पावसाळ्यानंतर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT