Chef Sanjeev Kapoor
Chef Sanjeev Kapoor sakal
कोकण

सांगलीला खाद्य ब्रॅंडची ‘संजीव’नी

सकाळ वृत्तसेवा

भडंगची खासियत

जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार हवा भारतातील प्रख्यात शेफ संजीव कपूर यांनी सांगलीने तुमचे खास खाद्य पदार्थ जगासमोर ब्रॅंड म्हणून आणावेत आणि त्यांचा डंका वाजवावा, असे आवाहन केले आहे. असे कोणते पदार्थ हे खास सांगलीची ओळख बनू शकतात, याचा शोध घेता काही विशेष पदार्थ पुढे येतात. जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, उत्पादक या एकत्रित येऊन ठरवले, तर ते ब्रँड नक्कीच होऊ शकतात, एवढी त्यांची खासीयत आहे.

कवलापूरचा ‘गाजर हलवा’

मिरज तालुक्यातील कवलापूरची गाजरे जगात भारी मानली जातात. ती तेवढ्यापुरतीच राहिली आहे. संक्रांत आली की त्याची एखादी बातमी होते. त्या गाजराचा हलवा जगात पोहचवता येईल. ‘कवलापूर गाजर’ हा ब्रॅंड बनवता येईल. तिथल्या मातीत आणि पाण्यात एक वेगळा गुणधर्म आहे जो गाजराला एक वेगळ्या प्रकारची गोडी देतो. इथल्या गाजरांना चमकवण्यासाठी आणि बाजारात त्यांना ब्रॅंड बनवण्यासाठी कोणत्याही कृत्रिम केमिकलची गरज नाही.

बेदाणा म्हणजे सांगलीच

संजीव कपूर सांगतात, बेदाणा म्हणजे दुसरे नाव तोंडात येतच नाही. बेदाणा म्हणजे सांगलीच ओ..! पण, अजून खूप काम करण्याची गरज आहे. लोक पैसे मोजायला तयार आहेत, मात्र त्यांना सेंद्रीय बेदाणा हवा आहे. तो सहज मिळाला पाहिजे. कुठल्या चौकातील दुकानांत विकला गेला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी धाडस दाखवून पिकवला पाहिजे आणि त्याला सरकारी यंत्रणांना तसे बळही दिले पाहिजे. इथला बेदाणा गुजरात, राजस्थानच्या बाजारात विकला जातो तेंव्हा त्यावर ‘सांगली बेदाणा’ हा ब्रॅंड नसेल तर डंका वाजणार कसा?

सांगलीची हटके भडंग

भडंग ही सांगलीची ओळख आहेच. ती सीमीत आहे. त्याची व्याप्ती वाढवावी लागेल. चिरमुऱ्याला अशी फोडणी भारतात कुठेही दिली जात नाही. ही चवच न्यारी आहे. त्यामुळे सांगलीबाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर भडंगाचे स्टॉल लागतात आणि त्यांना मागणीही प्रचंड आहे. इथली चिरमुरे बनवण्याची पद्धत जगावेगळी आहे आणि तीच भडंगाची खासीयत आहे.

आटपाडीचे डाळिंब

आटपाडीच्या डाळिंबाने सातासमुद्रापार आपला डंका वाजवायला सुरुवात केली आहे. वर्षानुवर्षे कोरड्या राहिलेल्या जमिनींतून आता लालचुटुक डाळिंब पिकतोय. तो जितका लालचुटूक आहे तितकाच गोडही आहे. डाळींब रसाला वेगळी मोठी बाजारपेठ मिळते आहे. अगदी पेपर बोटसारख्या उत्पादनांतून डाळींब रस विकला जावू लागला आहे. तो ‘सांगलीचे डाळिंब’ म्हणून वाजतगाजत विकला जावा, अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल.

सोनी, मणेराजुरीची द्राक्षे

जळगावची केळी, नाशिकची संत्री, तशी सांगलीची द्राक्षे नाशिकच्या बरोबरीने प्रसिद्धच आहेत. त्यात सोनी (ता. मिरज), मणेराजुरी (ता. तासगाव) आणि पळशी (ता. खानापूर) या पट्ट्यातील द्राक्षाच्या गोडीची बातच न्यारी आहे. रसाळ, लांबसडक आणि तजेलदार द्राक्षांना सातासमुद्रापार बाजारपेठ मिळते आहे. फक्त त्याला ‘सांगलीची द्राक्षे’ हा ब्रँड लागला पाहिजे.

हळदीची सांगली

जगात कुठेही हळदीचा विषय निघाला तर तो सांगलीपर्यंत येऊन पोहचतो. सेलमला सर्वाधिक हळद पिकते, मात्र ती विकते आणि पिसते सांगलीत. ही सर्वात मोठी हळद उतारपेठ आणि प्रक्रिया केंद्र आहे. कच्च्या हळदीपासून असंख्य प्रकारचे पदार्थ बनवतात. अगदी लोणचेदेखील. ‘आम्ही आमच्या औषधांमध्ये सांगलीची हळद वापरतो’, असे औषध कंपन्यांनी अभिमानाने सांगावे, इतका डंका वाजला पाहिजे, असे संजीव कपून सुचवतात. सेंद्रीय हळद पिकवल्यास तिला सोन्याचा भाव मिळेल, असे ते सांगतात. जिल्ह्यात द्राक्ष, उसाचे अतिरिक्त उत्पादन होतेय. अशावेळी हळद पिकास प्राधान्य देता येणे शक्य आहे.

माणदेशी मटण

आटपाडीतून येणाऱ्या मटणाला वेगळी चव असते, असे खवय्ये सांगतात. खास तिकडून मटण मागवतात. हे मटण भारतभर ‘सांगलीचे मटण’ म्हणून प्रसिद्धीस येऊ शकते. आटपाडीच्या माळरानावर चरणाऱ्या बोकडांचे हे मटण भारतीय मांसाहारी खवय्यांना खास आमंत्रण ठरू शकते.

चांदोलीत मासे पैदास

चांदोलीचे धरण हे जिह्याचे सर्वार्थाने बलस्थान आहे. या धरणात माशांची पैदास करणे आणि त्याचे ब्रॅंडिंग करणे सहज आणि सोपे आहे. त्यासाठी आवश्‍यक मान्यता मिळवायला हव्यात. चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांना लोक भेट देतील तेंव्हा त्यांना आवर्जून चांदोलीत माशांवर ताव मारण्याची संधी मिळायला हवी.

सांगली बाजार समिती महाराष्ट्र आणि देशातील खाद्य मेळाव्यांमध्ये सांगलीची वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती घेऊन उतरण्याची तयारी करत आहे. इथली हळद, बेदाणा, भडंग, द्राक्ष आम्ही जाणीवपूर्वक प्रकाशझोतात आणू. संजीव कपूर यांच्यासारख्या प्रख्यात व्यक्तीने सांगलीकरांना साद घातली आहे, आम्ही त्याला प्रतिसाद नक्कीच देऊ.

दिनकर पाटील, सभापती, सांगली बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT