Harne Port sakal
कोकण

ऐन हंगामात मासळीवर संक्रात; हर्णे बंदरातील नौकांना खाड्यांचा आधार

राज्यसरकार आम्हा मच्छीमारांकडे लक्ष देणार की नाही; धनाजी पावसे

सकाळ वृत्तसेवा

हर्णे : पाकिस्तानमधील वादळ गुजरातमार्गे महाराष्ट्रावर धडकल्याने अरबीसमुद्रामध्ये वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जोरदार सोसाट्याचे वारे वाहत असल्याने हर्णे बंदरातील नौकांनी मिळेल त्या बंदराचा तसेच खाड्यांचा आधार घेतला आहे. पुन्हा एकदा वातावरणामुळे मासळी उद्योगावर ऐन हंगामात संक्रात आल्यामुळे मच्छीमार चिंतेत पडला आहे.

सध्या हर्णे बंदरात मलपी येथील फास्टर नौकांमुळे मासळी दुष्काळ आला होता. त्यात या वादळांन तोंड फोडलं आहे. पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. गेले दोन दिवसांत तुरळक पाऊस देखील पडला. तसेच या वादळामुळे गेले दोन दिवस उत्तरेकडून दक्षिणेकडे जोरदार सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत. अचानक आलेल्या या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या नौकांची तारांबळच उडाली. मिळेल त्या बंदरात व खाडीत सुरक्षिततेसाठी पलायन केले. २०० नौकानी रत्नागिरी बंदरात, साधारण ४०० नौकांनी हर्णे बंदरात तर जयगड खाडीत १०० ते १५० नौका तर किमान १०० नौकांनी आंजर्ले खाडीत आसरा घेतला आहे. अजूनही पुढील दोन दिवस असच शांत रहावं लागणार आहे. जोपर्यंत हे वादळी वातावरण शांत होत नाही तोपर्यंत आम्ही मासेमारीकरिता जाऊ शकत नाही ; असे येथील मच्छीमारांनी सांगितले.

सध्या हर्णे बंदरात खूपच मासळी उद्योगाची कठीण परिस्थिती होऊन बसली आहे. कारण केरळ मलपी येथील याच भागात थव्याने येऊन नियमांचं उल्लंघन करून मासेमारी करून जातात. त्यामुळे येथील पारंपरिक मच्छीमारांना मासेमारी गेल्यावर पाहिजे ती मासळीच मिळत नाही. कधी कधी मिळेल त्याला मिळत नाही त्याला काहीच मिळत नाही. ज्या मासळीला दरच नाही ती मासळी मिळते परंतु सध्या खूपच दुष्काळ पडला आहे. त्यात या अशा बिघडलेल्या वातावरणामुळे तोंडचं फुटते. हे असंच चालू राहील तर उद्योग लवकरच आटपता घेणार असल्याचे देखील येथील मच्छीमारांनी सांगितले.आम्हा मच्छीमारांना कोणीही नेता नाही की कोणीही वालीदेखील नाही. अशी ही आस्मानी संकट आली की आम्ही आमच होणार नुकसान उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. आमची होणारी फरफट कुठल्याच सरकारला दिसत नाही का? शिवाय फास्टर नौकांची अवैध मासेमारी आम्हाला रोजच मारत आहे. राज्यसरकार आम्हा मच्छीमारांकडे लक्ष देणार की नाही; अशी संतप्त प्रतिक्रिया हर्णे बंदरातील मच्छीमार श्री. धनाजी पावसे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT