कोकण

झुंडीने आलात तरी पुरून उरेन - संतोष नानचे

सकाळवृत्तसेवा

दोडामार्ग - अल्पमतात असतानाही मी केलेली विकासकामे त्यांच्या डोळ्यात खुपतात. त्यामुळे ते माझ्यावर आरोप करत आहेत. मी खासदार नारायण राणे यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे झुंडीने जरी आलात तरी सर्वांना पुरून उरेन, असे प्रत्युत्तर नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिले.

उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यावरही त्यांनी टिका केली.
कसई दोडामार्गच्या नगराध्यक्ष लीना कुबल आणि उपनगराध्यक्ष चव्हाण यांनी सत्ताधारी नगरसेवकांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नानचे यांच्यावर विविध आरोप केले होते. त्या आरोपांना श्री. नानचे यांनी प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, ""माझ्या काळात अल्पमतात असताना केलेली विकासकामे यांच्या डोळ्यात खुपतात. त्यामुळे माझ्यावर आरोप केले जाताहेत. मी नगरपंचायत विकणार, असा आरोप केला गेला. प्रत्यक्षात मी नगरपंचायत विकणार यापेक्षा नगरपंचायतची खुली जागा कोणी विकली ह्याचा शोध घेतल्यास खरा आरोपी सापडेल.''

विद्यमान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या कुटुंबीयांची शहरात अनधिकृत बांधकामे आहेत. माझ्याबद्दल त्यांनी तक्रार करावीच; पण त्याआधी त्यांचीच मी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करणार असे सांगून मग पाहूया कोण खरा आरोपी व भ्रष्टाचारी आहे 

एलईडी लाईट, रस्ते,गटारे आदी कामे नियमात केली आहेत. कोंडवाड्याचा प्रश्‍न सुटणार आहे; पण सत्ताधाऱ्यांची मानसिकता नाही. कोंडवाड्याबाबत कोणाच्याही तक्रारी नाहीत; पण त्यांची मानसिकता कोंडवाडा करण्याची नसल्याने माझ्यावर आरोप केले जात आहेत असे सांगून त्यांनी सत्तेत असणाऱ्यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा विकासकामे करावी असेही म्हटले.

यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष रमेश दळवी, पांडुरंग बोर्डेकर, नगरसेविका आदिती मणेरीकर, महिमा म्हावळणकर, साक्षी कोरगांवकर, सुनील बोर्डेकर, सुनील म्हावळणकर, प्रकाश काळबेकर आदी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT