Sarang's criticism of Sawant at the press conference 
कोकण

निवडणुकीमुळेच आश्‍वासने; सारंगांची सावंतांवर टीका

रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक, भगीरथ प्रतिष्ठान, देसाई डेअरी यांनी सावंतवाडी माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत गेली पाच वर्षे अध्यक्ष म्हणून असताना आज निवडणूक तोंडावर आल्याने ते शेतकऱ्यांना आश्‍वासन देत फसवणूक करण्याचे काम करत आहेत, असा आरोप करत निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ही फसवेगिरी सुरू आहे; याला आमचे शेतकरी बळी पडणार नाहीत, अशी टीका भाजप नेते महेश सारंग यांनी केली. 

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातूनच जिल्हा बॅंकेचा विकास होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, ""खासदार राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना कणकवलीमध्ये डेअरी बांधली आणि शेतकऱ्यांना प्रत्येक घरात मुऱ्हा जातीची म्हैस देण्यात आली. त्यावेळी डेअरीमध्ये दररोज पंचवीस ते तीस हजार लिटर दूध जमा होत होते. त्यानंतर त्या म्हशींची वासरे होती तिथपर्यंत डेअरीत दूध येत होते. नंतर हळूहळू दूध कमी झाले आणि डेअरी बंद करण्यात आली.

डेअरी चालू ठेवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; परंतु ते सफल झाले नाहीत. शेतकऱ्यांनी अनेक बॅंकांकडून कर्जे घेतली. काही जणांनी आपले घरदार विकले. मुऱ्हा जातीच्या म्हशींना येणारा खर्च आणि दुधातून मिळणारे उत्पन्न याचा कुठेही ताळमेळ लागत नाही. एक किंवा दोन वर्ष म्हशी पाळणे परवडते. नंतर म्हैस दूध देण्याचे बंद झाले की त्या जनावरांना पोसणे अवघड काम असते. स्वत: श्री. सावंत यांनी स्वत:च्या गावात आणि कणकवली तालुक्‍यात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज दिली. त्यापैकी किती शेतकरी सुखी झाले, हे प्रथम पाहावे.'' 

..तर द्या फुकट म्हशी 
जिल्हा बॅंकेला आपला शेतकरी सुखी व्हावा असे वाटत असेल, तर ज्याप्रकारे श्री. राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना फुकट जनावरे दिली, तशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्यांना फुकट म्हशी द्याव्यात. अजूनही काही शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना दिलेल्या म्हशी आहेत. जिल्हा बॅंक सर्वांना कर्ज देते. शेतकऱ्यांच्या कर्जापोटी जमीन तारण घेऊन थकीत रक्कम झाल्यावर रोज वसुली पथक पाठवते. त्यावेळी कोणीही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत नाही, अशी टीका सारंग यांनी केली. 
 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT