कोकण

'असं केलं' तर अवघ्या 15 दिवसात गावं होतील कोरोनामुक्‍त; पोपटरावांचा सरपंचांना सूचक सल्ला

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : आपला गाव कोरोना मुक्‍त करण्यासाठी पाच पथकांनी समन्वयाने काम केलं तर अवघ्या १५ दिवसांत प्रत्‍येक गाव कोरोनामुक्‍त होईल. सिंधुदुर्ग जिल्हा (SIndhuudrg)देखील कोरोनामुक्‍त(Covid free) होण्यास वेळ लागणार नाही, अशी ग्‍वाही हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार (Sarpanch of Hivrebazar Padma Shri Popatrao Pawar)यांनी आज दिली. सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्‍त करण्याच्या अनुषंगाने आमदार नीतेश राणे यांनी आज पोपटराव पवार यांच्याशी जिल्ह्यातील सर्व सरपंचांचा ऑनलाईन संवाद घडवून आणला. यात पवार यांनी कोरोनामुक्‍त गावासाठी पाच पथकांची पंचसूत्री सांगितली. ते म्‍हणाले, की कुटुंब सर्वेक्षण पथक, वाहन चालक पथक, विलगीकरणकक्ष पथक, डॉक्‍टर हेल्‍पलाईन पथक आणि लसीकरण पथकाच्या कामगिरीवर आमचा गाव कोरोनामुक्‍त करून दाखवला. sarpanch-of-hiware-bazar-popatrao-pawar-covid-free-village-tips-kokan-marathi-news

काय म्हणाले पोपटराव?

- गावात सर्वप्रथम सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण

- सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांची रॅपिड टेस्ट

- निगेटिव्ह आले त्‍यांची आरटीपीसीआर

- वाहन चालक पथकाने सर्वांना शहरापर्यंत नेले.

- उपचाराची जबाबदारी डॉक्‍टर हेल्‍पलाईनकडे

- बाधितांची विलगीकरण कक्षात रवानगी

- डॉक्‍टरांसह विलगीकरण कक्ष पथकाची चोख कामगिरी

- नातेवाईकांना विलगीकरण कक्षात येण्यास मज्जाव

- परिणामी गावात कोरोना संसर्ग टळला

- लसीकरण पथकानेही पार पाडली महत्त्‍वाची जबाबदारी

- सर्वप्रथम ज्‍येष्ट, फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण

इतरांनीही केली मदत

कोरोना मुक्‍त गावासाठी झटणाऱ्या या पाच पथकांना शिक्षक, पालक, विद्यार्थी संघानेही सर्वतोपरी मदत केली. त्‍यामुळे अवघ्या १५ दिवसांत हिवरेबाजार कोरोनामुक्‍त झाला. त्‍याच धर्तीवर सिंधुदुर्गातील प्रत्‍येक गाव कोरोना मुक्‍त होऊ शकतो, असे पवार म्‍हणाले. दरम्‍यान सर्व सरपंचांना विमाकवच मिळावे, १८ वर्षांवरील सरपंचांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे आदी मागण्या आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्‍याचेही त्यांनी सांगितले. सरपंचांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT