sarpanch reservation period to late in kankavli also declared in this month in sindhudurg 
कोकण

सरपंच आरक्षण सोडत लांबणीवर ; महिन्याभरात होणार कार्यक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (रत्नागिरी) : राज्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम महिन्याभरात आयोजित केला जाईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केल्याने आता सरपंच आरक्षण सोडत लांबणीवर पडली आहे. यामुळे इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या उत्सूकतेला अजून काही काळ प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.

आता 2020 ते 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत एकाच वेळी काढली जाणार आहे. राज्याच्या गामविकास विभागाने यापुर्वी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा झालेला कार्यक्रम रद्द केला होता. त्यामुळे राज्यात नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. तो कार्यक्रम एकाचवेळी जाहीर होण्याची शक्‍याता आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका चा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे.

आता विजयी झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. मात्र ही प्रक्रिया अजून काही काळ लांबणीवर पडणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता 21 जानेवारीला संपुष्टात येणार आहे. तरीही तीस दिवसाच्या कालावधी उमेदवारांना निवडणूकीतील आपला खर्च सादर करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. यंदा सरपंच आरक्षण जाहीर न झाल्याने निवडणुकीतील उमेदवारांमध्ये थोडीशी नाराजी होती; मात्र आता उमेदवार निवडून आल्याने त्यांना आपल्याला अपेक्षित असलेले आरक्षण गावात सरपंच पदासाठी निश्‍चित होईल.

यासाठी प्रत्येकजण देव पाण्यात भिजवून आहेत. सरपंच पदाचे आरक्षण लवकरच जाहीर व्हावे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे; मात्र ग्रामविकास विभागाने याबाबत ठोस असा निर्णय अद्याप जाहीर न केल्याने सरपंच पदाकडे डोळे लावून बसलेल्या आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रतिक्षेला अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT