Superintendent Of Jail Training In Pune Kokan Marathi News 
कोकण

सावंतवाडीत कारागृहाच्या अधीक्षकाला पुन्हा का बरं घ्यावे लागले प्रशिक्षण...?

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिधुदूर्ग) : येथील कारागृहात देवगडमधील राजेश गावकर या कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कारागृहाचे अधीक्षक योगेश पाटील यांची अखेर पुणे येथील येरवडा कारागृह प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश कारागृह प्रशासनास प्राप्त झाले. कारागृह अधीक्षक प्रभारीपदी श्री. गुटेकर यांच्याकडे सूत्रे दिली आहेत.

सावंतवाडी कारागृहातील कैदी राजेंद्र गावकर यांचा महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. हा मृत्यू कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची चर्चा सर्वत्र होती. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसही कसून चौकशी करत होते. मध्यंतरी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनीही सावंतवाडी कारागृहाचे अधीक्षक योगेश पाटील यांची तीन दिवस कसून चौकशी केली होती.

कारागृहाचे कामकाज वादाच्या भोवऱ्यात 

गावकर यांचे शवविच्छेदन करणारे कोल्हापूर येथील वैद्यकीय पथकही गावकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची तपासणी करण्यासाठी सावंतवाडी कारागृहात आले होते. त्यामुळे सावंतवाडी कारागृहाचे कामकाज चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.कारागृह अधीक्षक कामाविरोधात मनसेतर्फे घंटानाद आंदोलनही केले होते; मात्र कारागृहाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांना योगेश पाटील यांची कसून चौकशी सुरू आहे व त्यांच्यावर १५ दिवसात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन देत आंदोलन मागे घेण्याचे सूचविले होते.

प्रशिक्षणासाठी रवानगी

त्यानंतर मनसेने २६ जानेवारीचे आंदोलन स्थगित केले होते. काल (ता.२७) कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांची पुणे येथील येरवडा कारागृहात प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त झाले. याबाबत कारागृह अधीक्षक श्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुणे येथील येरवडा जेलमध्ये प्रशिक्षणासाठी रवानगी झाली असून बदली झाली नसल्याचे सांगितले. तसेच श्री गुटेकर यांच्याकडे कारागृहांचा प्रभारी कारभार सोपविल्याचे ते म्हणाले. याबाबत कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT