st bus sakal
कोकण

सावंतवाडी बसस्थानकाला ‘जीएसटी’चे ग्रहण

पाच वर्षांत केवळ वर्कशॉपच पूर्ण

राजेश नागरे

सावंतवाडी : येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत बसस्थानकाच्या कामाला जीएसटीचे ग्रहण लागले आहे. हे काम जीएसटीच्या वाढीव रकमेअभावी रखडले आहे. जीएसटी रकमेअभावी संबंधित ठेकेदाराला या कामात निव्वळ तोटा असल्याने पाच वर्षांत केवळ वर्कशॉपचे काम होऊ शकले. त्यामुळे हे काम मार्गी लावण्यासाठी एसटी महामंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

सावंतवाडी शहरामध्ये संपूर्ण कोकणातील अद्ययावत एसटी बसस्थानक उभारण्याचा मुहूर्त तत्कालीन पालकमंत्री तथा सध्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला होता. केसरकरांनी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला सूचना करताना दोन वर्षांत हे काम मार्गी लावा, असेही केसरकरांनी म्हटले होते; मात्र याला पाच वर्षे उलटूनही बसस्थानकाचे काम मार्गी लागताना दिसत नाही. सद्य:स्थितीत संबंधित ठेकेदाराने वर्कशॉपचे काम पूर्णत्वास नेले आहे. उर्वरित काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शंकाच आहे.

कारण, जीएसटी या कामाच्या आड येत आहे. संबंधित काम हाती घेतले तेव्हा भारत सरकारकडून जीएसटीचा निर्णय झाला नव्हता; मात्र नंतरच्या काळात जीएसटी लागू झाल्याने बांधकाम साहित्य दरात वाढ झाली. परिणामी, संबंधित ठेकेदार या कामात तोट्यात आला. कारण, पूर्वीची रक्कम आणि त्यानंतरची वाढीव रक्कम यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली. एकूणच ठेकेदाराने आपल्याला संबंधित कामाच्या टेंडरमध्ये जीएसटीची रक्कम सामावून द्यावी, अशी मागणी एसटी प्रशासनाकडे केली; मात्र गेली पाच वर्षे ही मागणी पूर्ण होत नसल्याने बसस्थानकाचे काम रखडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT