महावितरण विरोधात शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबला
महावितरण विरोधात शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबला sakal
कोकण

सावंतवाडी : भारनियमन न थांबल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी: महावितरण विरोधात शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबला, असे जर कोणाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. त्यामुळे वारंवार होणारे अनियमित भारनियमन तत्काळ न थांबविल्यास पुन्हा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला.

शहरात सुरू असलेल्या अनियमित भारनियमनाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सहकाऱ्यांसमवेत आज महावितरणच्या कार्यालयाला धडक दिली; मात्र तिथे कोणी जबाबदार अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे त्यांनी संबंधित यंत्रणेचा निषेध करत प्रतिक्रिया दिली. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अब्दुल शेख, अतुल पेंढारकर आदी उपस्थित होते.

साळगावकर म्हणाले, ‘‘शहरात दिवसेंदिवस अनियमित भारनियमनाचे प्रमाण वाढत आहे. मागच्या आंदोलनानंतर नागरिकांवर गुन्हे दाखल करून आपण त्यांचा आवाज दाबला, असे संबंधित अधिकाऱ्यांना वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. काल दिवसभरात तब्बल एकवीस वेळा विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. परिणामी पुन्हा या ठिकाणी आंदोलन उभे राहू शकते. त्याआधी शहरात सुरू असलेली विजेची समस्या तत्काळ सोडवा; अन्य़था भविष्यात आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आंदोलन छेडू.’’

अधिकाऱ्यांकडून चर्चेची ग्वाही

दरम्यान, आज अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी कार्यालयात गेलो असता संबंधित जबाबदार अधिकारी ट्रेनिंगला गेल्याने उपलब्ध झाले नाहीत; मात्र मोबाईलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उद्या भेटून चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांना भेटून शहरातील वीज समस्येबाबत लक्ष वेधू, असे साळगावकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT