कोकण

सावंतवाडीत खड्डे बुजवण्यास सुरवात 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - येथील पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी बांधकाम विभागाला दणका दिल्यानंतर पावसाळी डांबर घालून काल येथील रस्ताचे खड्डे बुजवण्यात आले. पहिल्या टप्प्यात कोलगाव ते माजगाव असे खड्डे बुजवण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील काम हातात घेण्यात येईल, अशी माहिती बांधकाम अधिकाऱ्यांनी दिली. 

शहरातून जाणाऱ्या झाराप-पत्रादेवी त्या मुख्य रस्त्यावर तसेच आंबोली कडे जाणाऱ्या सावंतवाडी आंबोली या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे काम वेळेत करावे, मागणी पालिका पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांना केली होती.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी घेराओ घातला होता. तात्काळ कारवाई न झाल्यास तीव आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र आंदोलनाच्या 24 तासाच्या आत युवराज देसाई यांनी तात्काळ दखल घेत आज रस्त्यावरील मोठे खड्डे भरण्यास सुरुवात केली. त्यासाठी पावसाळी डांबराचा वापर करण्यात आला. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता लोकांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात कोळगाव सावंतवाडी परिसरातील खड्डे बुजवण्यात येणार आहेत. त्यानंतर आंबोली सावंतवाडी या रस्त्याचे काम हातात घेण्यात येणार आहे, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT