school student issues statement mla nitesh rane 
कोकण

पटसंख्या वाढवण्यासाठी एकत्र यावे ः आमदार राणे

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहेत. सुंदर अशा इमारती उभारल्या जात असून अद्यावत सुविधांनी शाळा सुसज्ज होत आहेत; मात्र त्याचवेळी शाळांची दिवसेंदिवस कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता येईल याकडे जिल्हा परिषद, शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधी या सर्वांनीच एकत्र येत विचार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. 
उभादांडा नवाबाग शाळा क्रमांक 1 च्या सभागृहाचा भुमिपूजन कार्यक्रम आमदार राणे यांच्या हस्ते झाला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास कुबल, प्रितेश राऊळ, मनिष दळवी, वसंत तांडेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा केळुस्कर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुस्कर, बाबली वायंगणकर, सुजाता देसाई, नगरसेविका कृपा गिरप, प्रसाद पाटकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, कमलेश गावडे, तुषार साळगांवकर, नितिन चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका तन्वी रेडकर, रामा पोळजी, मारुती गढूळकर, प्राजक्ता आपटे, रामचंद्र आरावंदेकर, नारायण तारी, उत्तम आरावंदेकर, श्‍यामसुदर कोळंबकर, वैष्णवी केळुस्कर, अक्षरा गोकरणकर आदी उपस्थित होते. 
यावेळी विष्णूदास कुबल यांनी या सभागृहाचा वापर विद्यार्थ्यांबरोबरच गावातील छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी केला जाणार असून त्यातुन मिळणारा निधी शाळेच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वसंत तांडेल यांनी मानले. 

गुणवंतांचा गौरव 
या शाळेची माजी विद्यार्थीनी दिव्यता मसुरकर हिने वक्तृत्व स्पर्धेत तर लिलावती केळुस्कर हिने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा श्री. राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शाळेत सुरू करण्यात आलेला एमएससीआयटी कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आमदार राणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली.

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT