कोकण

विद्यार्थिनींनी तयार केले हिरकूट काढणारे यंत्र

प्रकाश जोशी

चिपळूण - नारळाच्या झावळांपासून झाडू करण्याचा यंत्राचा प्रकल्प राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी निवडण्यात आला आहे. अलोरेच्या मोरेश्‍वर आगवेकर माध्यमिक विद्यालयातील शर्वरी शिंदे व साक्षी सकपाळ या विद्यार्थिनींनी हा प्रकल्प केला आहे. पाच ते सहा मिनिटात एक झाडू तयार होईल, एवढे हिरकूट हे यंत्र कापू शकते. त्यामुळे या प्रकल्पाची प्रदर्शनात वाहव्वा झाली. 

कोकणात घरोघरी नारळाची झाडे असतात. त्यामुळे सुक्या झावळांचे हिरकूट काढून झाडू बांधण्याचे काम केले जाते. त्यातून उत्पन्नही मिळते. परंतु हे हिरकूट काढायला बराच वेळ लागतो. आता हिरकूट काढण्याऐवढा वेळ कोणाकडेही नाही. त्यामुळे अनेकवेळा या झावळा वाया जातात किंवा त्या जाळल्या जातात. हे लक्षात घेवून नारळाच्या झावळाचे हिरकूट काढणारे एक यंत्र या विद्यार्थिनींनी तयार केले आहे. यामध्ये चाकू स्थिर ठेवून हीरकूट समान आकाराने कापले जातात.

एक नजर - 

  • सुमारे दोन हजार खर्च 
  • 12 व्होल्टचा चार्जर किंवा सौर पॅनेलचाही उपयोग
  • पाच ते सहा मिनिटात एका झाडूचे काम
  • राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी प्रकल्पाची निवड

त्यासाठी यंत्रात झावळा कापण्याचा चाकू स्थिर ठेवून त्यावरून झावळ्या कापल्या जातील, अशा पद्धतीची रचना केली. यंत्रासाठी सौरऊर्जा निर्मितीचे पॅनेल किंवा 12 व्होल्टचा चार्जरही वापरता येईल. या यंत्राच्या आधारे झावळ्याच्या कापलेल्या हिरकुटापासून झाडू करता येतात. त्यामुळे रोजगारनिर्मिती देखील होऊ शकते. कारण यंत्र तयार करण्यासाठी केवळ दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. 

यावर्षी जिल्हा विज्ञान प्रदर्शनात रोजच्या जीवनातील समस्यावर वैज्ञानिक उपाय हा विषय देण्यात आला होता. त्यानुसार आगवेकर विद्यालयाचे विज्ञान शिक्षक भगवान जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सादर करण्यात आला होता. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाल्याने त्याची निवड राज्य प्रदर्शनासाठी झाल्याचे मुख्याध्यापक अरुण माने व विज्ञान शिक्षक भगवान जांभळे यांनी सांगितले.

कोकणातील भरपूर उपलब्ध असलेल्या नारळाच्या झावळ्यापासून झाडू निर्मिती केल्यास रोजगार निर्मिती करता येते हे या प्रयोगातून सिद्ध केले आहे.

- भगवान जांभळे, विज्ञान शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT