sea area of konkan and blue waves attract tourist in ratnagiri 
कोकण

येवा कोकण आपलाच असा ; निळ्याशार समुद्र पर्यटकांना घालतोय साद

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोलमडलेला कोकण किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसाय आता पुन्हा बहरू लागला आहे. पर्यटन व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत. समुद्राच्या निळ्याशार लाटांची मौज आणि स्वच्छ सुंदर दापोली तालुक्‍यातील किनारपट्टी पर्यटकांना भुरळ घालत असून तालुक्‍यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. 

पर्यटन व्यवसाय पुन्हा बाळसे धरू लागल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, निवासी न्याहरी योजना, घरगुती खानावळी आदी पर्यटनावर आधारित विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या व्यवसायांचे जाळे येथे उभे राहिले आहे. तालुक्‍यातील किनारपट्टीवरील नागरिकांना घरच्याघरीच रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

पर्यटन व्यवसायाच्या रोजगाराच्या उपलब्ध संधीतून पर्यटन व्यावसायिकांची आर्थिक कमाईसुद्धा होत असून त्यामुळे अनेकांनी व्यवसायवाढीसाठी विविध वित्तीय संस्था, बॅंका आदींकडून कर्ज घेतले आहे. अनलॉकनंतर घरीच थांबलेले पर्यटक कोकणात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे हळूहळू का होईना पर्यटक व्यावसायिकांची आर्थिक चिंता दूर 
होत आहे. 

निसर्गाच्या संकटातून पुन्हा उभे राहण्याची तयारी

येथील किनाऱ्यावर आलेल्या निसर्ग वादळामुळे अपरिमित नुकसान झाले आहे. त्याच्या भरपाईचे वाटप सुरू असले तरी झालेल्या नुकसानीची भरपाई होण्यासाठी मोठा काळ जाणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना इतर रोजगाराच्या संधी शोधाव्या लागणार आहेत. या पर्यटनाच्या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांची घरीच सोय करणे, त्यांना विविध प्रकारच्या सेवा देणे आदीच्या माध्यमातून पुन्हा उभे राहण्याची तयारी येथील नागरिक करत आहेत. त्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत जोरदारपणे केले जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT