This is the second death of makadtap in Sawantwadi taluka 
कोकण

माकडतापाने आणखी एकाचा मृत्यू.... 

सकाळ वृत्तसेवा

बांदा - डेगवे-मोयझरवाडी येथील दिनेश शांताराम देसाई (वय 45) यांचा गोवा-बांबोळी रुग्णालयात माकडतापाने मृत्यू झाला. गेले दीड महिने त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सावंतवाडी तालुक्‍यातील पंधरा दिवसातील माकडतापाचा हा दुसरा बळी आहे. 

दिनेश देसाई हे डेगवेतील काजू बागायतदार व शेतकरी होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ताप आल्याने त्यांना नातेवाईकांनी सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विज्ञान संस्थेत पाठविले होते. तेथे त्यांना माकडताप झाल्याचे निदान झाले होते. सावंतवाडी येथे त्यांची प्रकृती बिघडल्याने 8 फेब्रुवारीला त्यांना गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविले होते. तेथे गेला दीड महिना त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते; मात्र त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. अखेर मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालविली. पंधरा दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्‍यातील पडवे-माजगाव धनगरवाडी येथील लक्ष्मण शिंदे यांचा देखील माकडतापाने मृत्यू झाला होता. आज सकाळी डेगवे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई-वडील, 2 भाऊ, 2 विवाहित बहिणी भावजय असा परिवार आहे. 

दोन रुग्णांवर उपचार सुरू 

दोन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील भालावल येथे दोन रुग्ण माकडताप पॉझिटीव्ह सापडले असून त्यांच्यावर तळकट (ता. दोडामार्ग) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ऐन काजू हंगामात गेल्या पंधरा दिवसात माकडतापाने दोन बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT