The second wall of the bridge is also dangerous in kankvli sindhudurg 
कोकण

कणकवलीकरांनो सावधान! पुलाची दुसरी भिंतही धोकादायक

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) -शहरातील उड्डाणपुलाला जोडणाऱ्या भिंतीचा दुसरा भाग देखील धोकादायक झाला असून तो कधीही कोसळण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर हॉटेल मंजूनाथ ते एस. एम. हायस्कूल अंडरपास पर्यंतचा रस्ता सील केला आहे. त्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आल्याने शहरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे. 

शहरातील एस.एम.हायस्कूलनजीक उड्डाणपुलाला जोडणारी भिंत सात दिवसापूर्वी कोसळली होती. या भागाची डागडुजी ठेकेदाराकडून सुरू आहे. त्यानंतर आता या भिंतीचा दुसऱ्या बाजूचे सिमेंट बॉक्‍स बाहेर आले असून ही भिंतही कोसळण्याचा धोका आहे. ही बाब ठेकेदार तसेच महामार्ग अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर हॉटेल मंजूनाथ ते एस. एम. हायस्कूल अंडरपास हा भाग सील केला असून, वाहनांसह पादचाऱ्यांनाही तेथे जाण्यास अटकाव करण्यात येत आहे.

सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद केल्याने, दुसऱ्या बाजूच्या सेवा रस्त्यावरून वाहनांची ये-जा केली जात आहे. तसेच महामार्गावरील वाहतूक मसुरकर किनई रोड तसेच भालचंद्र आश्रम रोड वरून वळविली आहे. हे दोन्ही रस्ते अरुंद असल्याने महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना ३००० मिळणार की ४५००? तीन महिन्यांच्या हप्त्यांबाबत पुढच्या काही तासात होणार निर्णय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी जिल्ह्यात अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी

IPL Delhi vs Chennai News: दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर दैव बदलणार?; धोनी नसला तरी चेन्नईचा आत्मविश्वास उंचावलेला

Akola News: टॅंकरवर वाढली शहराची निर्भरता; चारही झोनमध्ये दिवसाला १६ ते १८ टॅंकरच्या फेऱ्या

Akola News: जिल्ह्यातील ४० अधिकृत केंद्रांबाहेरील सोनोग्राफी बेकायदेशीर;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; अवैध तपासणीबाबत माहिती दिल्यास एक लाखांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT