Shimgotsav Festival esakal
कोकण

Konkan Shimgotsav : शिमगोत्सवादरम्यान रत्नागिरीतील 'या' गावांत 144 कलम लागू; पोलिस दलाकडून खबरदारी

शिमगोत्सवाची (Shimgotsav Festival) धूम सुरू असतानाच मानपान, पूर्ववैमनस्यातून गावात वाद सुरू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिमगोत्सवाच्या सणावर विरजण पडू नये, यासाठी पोलिस दलाने ही खबरदारी घेतली आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सवाची (Shimgotsav Festival) धूम सुरू असतानाच मानपान, पूर्ववैमनस्यातून गावात वाद सुरू आहेत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राजापूर (Rajapur) तालुक्यातील केळवडे, डोंगर या २ गावांमध्ये उत्सव काळात १४४ कलम नुसार मनाई आदेश लागू केला आहे.

याशिवाय खेड तालुक्यातील धवडे, चिपळूण तालुक्यातील अलोरे नजीकच्या नांदिवसे, लांजा तालुक्यातील पूनस येथे १४४ कलम लागू करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. कोकणात शिमगोत्सव हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. अनेक गावांच्या हा सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगळ्या, अनोख्या आहेत.

फाल्गुन महिन्याचे शुक्ल पक्षाचे पंचमी म्हणजेच फाकपंचमीला शिमगोत्सव सुरू होतो; तर धूलिवंदनाच्या दिवशी या सणाचा मुख्य पहिल्या टप्प्याची सांगता होते. गावोगावी हा शिमगोत्सव साजरा करत असताना अनेकदा गावकरी, मानकरी यांच्यात वाद होतात. त्यामुळे उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागते. गावांत निर्माण होणारे मानपानाचे वाद शिमगोत्सवात आडवे येऊ नयेत, हे वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी तेथील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जातात.

मात्र ज्या ठिकाणी वाद मिटवण्यात पोलिसांना यश येत नाही. अशा गावांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार राजापूर तालुक्यातील केळवडे, डोंगर या २ गावांमध्ये शिमगोत्सवासाठी १४४ कलम लागू केले आहे. खेड तालुक्यातील धवडे, चिपळूण तालुक्यातील अलोरे नजीकच्या नांदिवसे, लांजा तालुक्यातील पूनस येथे १४४ कलम लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिमगोत्सवाच्या सणावर विरजण पडू नये, यासाठी पोलिस दलाने ही खबरदारी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT