see area atmosphere change and effect on fishing in ratnagiri 
कोकण

मतलई वाऱ्यांनी गणित बिघडवले अन् मासळीचे दर मात्र कडाडले

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पहाटेच्या सुमारास वाहणाऱ्या मतलई वाऱ्यांनी मच्छीमारांचे गणित बिघडले आहे. वेगवान वाऱ्यांमुळे समुद्रात पाण्याला करंट असून मासळीचा रिपोर्टच मिळत नाही. परिणामी काही मच्छीमारी नौकांनी बंदरातच उभे राहणे पसंत केले आहे. दहा वावात मासेमारी करणाऱ्या गिलनेटवाल्यांना जेलीफिश, डॉल्फिनच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मासळीचे दर वधारले आहेत.

यंदा मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर ऑक्‍टोबरपर्यंत बदलत्या वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. नोव्हेंबर महिना मच्छीमारांसाठी चांगला जाणार, अशी आशा होती. मासळी कमी मिळत असली तरीही दर बरे होते; मात्र अखेरच्या टप्प्यात मतलई वाऱ्यांनी मासेमारीत अडथळा आणला आहे. शनिवारपासून मतलई वारे सुरू झाले आहेत. 

पहाटेच्या सुमारास वारे वाहत असल्याने दुपारपर्यंत पाणी अस्थिर राहते. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या अनेकांना मासळीच मिळालेली नाही. काही मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या केल्या आहेत. चांगला दर देणारे पापलेट, सरंगा, सुरमई यांच्या किमतीत वाढ झाली आहे. गार वारे पाण्याला असलेला करंट यामुळे परिणाम झाल्याची शक्‍यत आहे. त्यापूर्वी मांदेली, छोटा बांगडी सापडत असून त्याचे दर अधिक आहेत. बांगड्याचा दर १०० रुपये किलोवरून १५० ते २०० रुपयांपर्यत 
वधारलेला आहे.

गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना मतलई वाऱ्यांचा फटका बसला आहे. या वाऱ्यांमुळे जेलीफिश, डॉल्फिन किनाऱ्याकडे वळतात. या दोन्ही माशांमुळे जाळी फाटतात आणि नुकसान होते. जाळ्यात सापडलेली मासळीही हे मासे खातात. झुंडीच्या झुंडीने डॉल्फिन किनाऱ्यावर फिरत आहेत. दोन्ही मासे गारव्याला किनाऱ्याकडे येतात. त्याचा फटका अनेक मच्छीमारांना बसला आहे.

"दहा वावात मासेमारी करणाऱ्यांना मासळी मिळत नाही. अनेकजण डॉल्फिन, जेलीफिशच्या भीतीने समुद्रात जात नाहीत."

- श्रीदत्त भुते, मच्छीमार

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT