Selling alcohol online in ratnagiri 
कोकण

या शहरात चक्क होते ऑनलाईन दारू विक्री...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : टाळेबंधीच्या काळात संपूर्ण देशात दारु विक्री बंध असताना रत्नागिरीत ऑनलाईन दारू विक्री सुरू असल्याचे  बोलले जात आहे . त्यासाठी मद्य विक्री करणाऱ्या दुकानांच्या नावे फेसबुक पेज तयार करुन ऑर्डर प्रमाणे घरपोच दिली जाईल असे म्हटले आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून संबंधित दुकानदार याविरुद्ध तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेले आहेत.


लॉकडाऊन कालावधीत संपूर्ण देश बंद  आहे. मद्य विक्रीही बंधी आहे. असे असताना रत्नागिरी शहरात राजरोसपणे ऑनलाईन पद्धतीने दारू विक्री केली जात आहे कि काय ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. रत्नागिरी शहरातील दोन मद्यविक्री करणाऱ्या दुकानांच्या नावाने चक्क फेसबुक पेज सुरु करून त्यावर दारूची ऑर्डर घेऊन घरपोच डिलिव्हरी केले जात असल्याचे बोलले जात आहे.

बोगस फेसबुक पेज; शहर पोलिस ठाण्यात संबंधितांची धाव

 फेसबुकपेज ज्या दुकानांच्या नावाने सुरु करण्यात आले आहे , त्यांच्या मालकांशी संपर्क साधला असता असे कोणतेही पेज आम्ही सुरु केले नसल्याची त्यांनी  सांगितले. याबाबत एका दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार दिली असून दुसरा दुकानदार देखील तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहचला आहे. या फेसबुक पेजवर दारूची ऑर्डर देण्यासाठी मोबाईल नंबर देखील देण्यात आला आहे. पोलिस याबाबत संबंधितांचा शोध घेत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT