Senior actor Raja Mayekar dead in mumbai kokan marathi news 
कोकण

लोकनाट्याचा 'राजा' हरपला  : ज्येष्ठ अभिनेते राजा मयेकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदूर्ग) :  मराठी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा मयेकर (वय 90, मूळचे चेंदवण, ता. कुडाळ) यांचे काल दुपारी बाराच्या दरम्यान मुंबई येथे घरी निधन झाले.

संध्याकाळी हिंदमाता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. ते 60 वर्षे अभिनय क्षेत्रात होते. लोकनाट्याचा "राजा' असा किताब मिळविणाऱ्या मयेकर यांनी वयाच्या 15 व्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. दूरदर्शनवरील "गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका त्या काळी प्रचंड गाजली होती. 

१५ व्या वर्षापासून रंगभूमीवर कामास सुरुवात

वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. आपल्या वैशिष्टपूर्ण अभिनयामुळे राजा मयेकर यांना लोकनाट्याचा राजा म्हणत असत. सुरुवातीच्या काळात त्यांनी दशावतारी नाटकांच्या माध्यमातून रंगभूमी गाजवली. 

लोकनाट्याचा राजा हरपला

त्यांनी नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत काम केले होते. राजा मयेकर यांचा अभिनयाचा प्रवास दशावतारी नाटकापासून सुरू झाला होता. "आंधळं दळतंय', "यमराज्यात एक रात्र' आणि "असूनी खास घरचा मालक' ही तीन लोकनाट्ये तुफान गाजली होती. शिवाय "बापाचा बाप', "नशीब फुटकं सांधून घ्या', "कोयना स्वयंवर' या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. कृष्णराव गणपतराव साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळे राजा मयेकर यांचे अभिनयात पहिले पाऊल पडले. आपल्या कारकीर्दीविषयी बोलताना याचा उल्लेख ते नेहमीच करीत असत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT