Seven suspects of Corona In Ratnagiri Marathi News 
कोकण

रत्नागिरीत कोरोनाचे सात संशयित

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोना व्हायरसचे जिल्हा शासकीय रुग्णालयात 7 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामध्ये हातीव (ता. राजापूर), गणपतीपुळे व जयगड येथील पाचजणांचा समावेश आहे. ते पुणे व ठाणे येथून जाऊन आल्याने त्यांना कोरोनासारखी लक्षणे जाणवू लागल्याने हे पाचही स्वतःहून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

शृंगारतळी (गुहागर) आणि कुवारबाव (रत्नागिरी) येथील दोघे आज दाखल झाले आहेत. या तिघांनाही सर्दी-खोकल्याचा त्रास असल्याने ते खबरदारी म्हणून दाखल झाले आहेत. परिस्थिती पाहून त्यांच्या थुंकीचे व थ्रोडचे नमूने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचे 5 संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यापूर्वी शहरातील थिबा पॅलेस परिसरातील एकजण कोरोना संशयित म्हणून दाखल झाला होता. त्या पाठोपाठ खेड येथे 2 संशयित सापडले होते. तर तीन दिवसांपूर्वी पूर्णगड येथे दुबई येथून आलेला एक संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असतानाच आता नवे तीन रुग्ण कोरोनासारखी लक्षणे जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात स्वतःहून दाखल झाले आहेत. 

हातीव (राजापूर) व गणपतीपुळे येथील दोघे हे पुणे येथे गेले होते तर जयगड येथील दोघेजण ठाणे येथे कामानिमित्त गेले होते. काल उशिरा हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज आणखी दोन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. एक कुवारबाव येथील आहे. तो पंजाबहून प्रवास करून आला आहे तर शृंगारतळी (गुहागर) येथील एकजण दुबईहून आला आहे.

या सातहीजणांना कोरोनासारखी लक्षणे जाणवू लागल्याने ते स्वतःहून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना स्वतंत्र कक्षामध्ये देखरेखीखाली ठेवले आहे. त्यांच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन थुंकीचे व थ्रोडचे नमूने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितली. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT