Sex racket uncovered at Oswal Nagar in Gandhibagh area sparks kokan crime news 
कोकण

कॉन्टॅक्‍ट लीस्टने अनेकांच्या पोटात गोळा; संशयित महिला मूग गिळूनच

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील फणशीबाग परिसरातील ओसवाल नगर येथे उघडकीस आलेल्या सेक्‍स रॅकेटने शहरात खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. अटकेतील संशयित महिलेने तोंड उघडले नसले तरी पोलिसांनी कॉल रेकॉर्ड मिळवून तपास करण्याचा पर्याय निघाला आहे. त्यासाठी सीडीआर मागवल्याने मोबाईल फोनद्वारेच याचा उलगडा होणार आहे. जे कॉन्टॅक्‍टमध्ये आले आहेत, त्यांच्या पोटात भितीचा गोळा आला आहे.मंत्री उदय सामंत यांनीही संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. 

शहरातील फणशीबाग परिसरातील एका बंगल्यात चालणाऱ्या सेक्‍स रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका पीडित युवतीची रॅकेट चालवणाऱ्या व्यक्तींच्या ताब्यातून सुटका केली. बाहेरील जिल्ह्यातून मुली आणून त्यांच्यामार्फत सेक्‍स रॅकेट सुरू होते. या ठिकाणी रत्नागिरीतील अनेक उच्चभ्रू वस्तीतील लोकांची ये-जा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हा प्रकार रत्नागिरीच्या संस्कृतीला न शोभणारा असून याविरोधात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

दरम्यान कॉन्टॅक्‍ट लिस्ट पोलिसांनी मिळवल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच काही मंडळींची पाचावर धारण बसली आहे. अनेकांनी बाहेरून कानोसा घेण्यास सुरुवात केली. या रेकेटमध्ये आणखी किती जणांचा नंबर लागणार हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT