sharad pawar press conference in dapoli ratnagiri 
कोकण

राज्यपालांचे शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञान कदाचित ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरुंपेक्षा जास्त असेल ; शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला. त्यांचे शैक्षणिक ज्ञान ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरूंपेक्षा अधिक असावे, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री. पवार आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 


नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एका प्रश्‍नावर ते म्हणाले, ""राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत त्या खात्याच्या मंत्र्यांशी बोललो होतो. कोरोनासारखी परिस्थिती असताना परीक्षांबाबत काय करता येईल, याबाबत माहिती घेतली. आयआयटी खरगपूर, कानपूर, दिल्ली, मुंबई यांनीही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा घ्यायच्या नाहीत, असा निर्णय घेण्यात आला होता.'' ज्या पालकांना आपल्या मुलांना कमी गुण मिळाले असे वाटत असेल, तर त्या मुलांना नंतर परीक्षा देता येईल, असा निर्णयही वाचनात आला असल्याचेही श्री. पवार म्हणाले.

ऑक्‍सफर्डच्या कुलगुरूंपेक्षा राज्यपालांचे ज्ञान अधिक 

दरम्यान, त्यामुळे विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षांचा प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहे. राज्यपालांनी सरकारने घेतलेला निर्णय थांबविला, याबाबत पवार म्हणाले, ""आयआयटीसारख्या ज्या सगळ्या संस्था आहेत, त्यांनी असाच निर्णय घेतला आहे. माझ्या वाचनात आल्यानुसार, ऑक्‍सफर्ड विद्यापीठ हे जगातील एक चांगले विद्यापीठ आहे. त्यांनीही असाच निर्णय घेतला आहे. राज्यपालांचे शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञान कदाचित ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरुंपेक्षा जास्त असेल. त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला आदर केला पाहिजे.'' 

सर्वांना कळायला हवे 
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर येऊन गेले. आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दापोली व मंडणगडचा दौरा करत आहेत, याबाबत श्री. पवार म्हणाले, ""चांगले आहे ना. सर्वांना कळले पाहिजे, की येथे नुकसान किती झाले आहे. मी बारामतीसारख्या दुष्काळग्रस्त भागातून आलो आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT