sharad pawar Tours in kokan marathi news 
कोकण

असा आहे शरद पवार यांचा उद्याचा दापोली - मंडणगड दौरा....

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : चक्रीवादळाने जिल्ह्यातील गुहागर, दापोली व मंडणगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर येत आहेत. आज रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा, दिवे आगर, माणगाव, रोहा तर उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगडात ना.पवार भेट देणार आहेत.

या दौऱ्याने नुकसानग्रस्तांना मदत आणि बाधित लोकांना पुन्हा उभारी मिळेल असे मत राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळण्यासाठी राबवाव्या लागणाऱ्या योजना, नुकसान भरपाईसाठी बदल करावे लागणारे निकष आदींबाबत चर्चा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांना दिलासा देण्यावर सरकारचा भर राहील.

बाधीत सर्वच घटकांना पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकार आग्रही आहे. असे श्री. जाधव यांनी सांगितले. उद्या सकाळी रोहा येथील निवासस्थानाहुन  अकराच्या सुमारास खेड - भरणे येथून दापोलीकडे रवाना होतील. दापोली तालुक्यातील मुरुड, आंजर्ला, केळशी, हर्णे बंदर या नुकसानग्रस्थ गावाची पहाणी करुन मंडणगड येथे रवाना.

येथील बाणकोट, वेसवी सह अन्य नुकसानग्रस्थ गावाची पहाणी करुन पुन्हा मंडणगड आंबेत मार्गे पुण्याकडे रवाना होतील अशी माहिती बाबाजी जाधव यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे  सोबत अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

Gold rate Today: नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज १ तोळ्याचा भाव किती?

Maternal Health : जिल्ह्यात ५ वर्षांत ३३ मातांचा मृत्यू; जिल्हा आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT