कोकण

नारुर येथे बुधवारपासून शतचंडी अनुष्ठान सोहळा

CD

swt161.jpg
83976
श्री देवी महालक्ष्मी

नारुर येथे बुधवारपासून
शतचंडी अनुष्ठान सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात २२ ते २५ मे या कालावधीत शतचंडी अनुष्ठान २०२४ सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (ता. २२) सकाळी ८ वाजता देहशुध्दी, देवतांना नारळ-विडा समर्पण, पुण्याहवाचन, देवता स्थापना, गुरुवारी (ता. २३) सकाळी ६ वाजता श्री चरणी लघुरुद्राभिषेक आणि सालंकृत महापूजा, जययज्ञ, ९ वाजता कुंकुमार्चन, दुपारी १२.३० वाजता आरती, १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता स्थानिक कार्यक्रम, रात्री ८ वाजता पालखी सोहळा, ८.३० वाजता भजन, १० वाजता श्री देवी महालक्ष्मी हौशी नाट्यमंडळ प्रस्तुत ऐतिहासिक नाटक, शुक्रवारी (ता. २४) सकाळी ६ वाजता ‘श्रीं’ चरणी लघुरुद्राभिषेक, स्थापित पूजन, सालंकृत महापूजा, जप हवन, ९ वाजता कुंकुमार्चन, दुपारी १२.३० वाजता आरती, १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता स्थानिक भजन, सायंकाळी ७ वाजता आरती, मंत्रजागर, रात्री ८.३० वाजता भजन, १० वाजता नितीन आशियेकर प्रस्तुत भूमिका दशावतार नाट्यमंडळ, मळगाव यांचा ''श्री संत बाळूमामा'' हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.
शनिवारी (ता. २५) सकाळी ६ वाजता लघुरुद्राभिषेक सालंकृत महापूजा, स्थापित देवता पूजन, ९ वाजता सत्यअंबा पूजा, दुपारी १२ वाजता पूर्णाहुती, मंत्राक्षता, सामुदायिक प्रार्थना, दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद, ३ वाजता स्थानिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ वाजता पालखी सोहळा, ८.३० वाजता भोजन, १० वाजता वालावलकर दशावतारी नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चार-बारा गावकर मंडळी, बहुमानकरी, नारुर ग्रामस्थ व महालक्ष्मी देवस्थान कमिटी, नारुरच्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT