shimga festival in ratnagiri start yesterday for five days with precaution of corona 
कोकण

रत्नागिरीत भैरीच्या शिमगोत्सवाला सुरवात; कोरोनामुळे पालखी भेटीला मोजकेच लोक

राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोनाचा कोकणातील शिमगोत्सवावर मोठा परिणाम झाला. उपस्थितीसाठी घालून दिलेल्या मर्यादा आणि नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिराचे रस्ते दोन्ही बाजूनी बंद करण्यात आले. त्यानंतर निर्बंधांचे पालन करीत होळी पौर्णिमेला काल (28) रात्री लवकर सडामिर्‍या, जाकिमिर्‍या व टेंभ्ये आदी गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्यांनी ग्रामदैवत श्री भैरीची भेट घेतली.

फाकपंचमीला सुरू होणार्‍या शिमगोत्सवाची सांगता रंगपंचमीला होते. बारा वाड्यांचा रखवालदार असलेल्या ग्रामदैवत श्री भैरी, जोगेश्‍वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्‍वराचा शिमगा म्हणजे सर्वांत मानाचा सोहळा. बारा वाड्यांतील ग्रामस्थ या उत्सवाला हजेरी लावतात. होळीपौर्णिमेला तालुक्यातील सडामिर्‍या येथील नवलादेवी-पावणादेवीची व जाकिमिर्‍या येथील नवलाई, पावणाई देवीची पालखी भैरीला भेटण्यासाठी येते. टेंभ्ये येथील भैरी जुगाईची पालखीही येते. अलीकडेच पडलेली परंपरा यावर्षी खंडित होऊ दिली नाही. या वेळी ‘हुरा रे हुरा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा’ अशा फाकांचा जयजयकार सुरू होता.
अनेकांनी पालख्या भेटीचा हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहुन शिमगोत्सवात भाविक मंत्रमुग्ध होतात. परंतु कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. 

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे कोकणातल्या शिमगोत्सवावर मर्यादा आल्या. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणेकडुन काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. देवस्थानांनी देखील त्याचे पालन केले. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी भैरी मंदिराकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूनी बंद केला होता. प्रवेश बंद असल्याने गर्दी टाळण्यास यंत्रणेला यश आले. मात्र पालखी भेटीच्या वेळी मर्यादीत भक्तांना सोडून पालखी भेटीचा उत्सव करण्यात आला. त्यामुळे सर्व पालख्यांची रात्री लवकर भेट झाली. रात्री उशिरा श्री देव भैरीची पालखी ग्रामप्रदक्षणेसाठी बाहेर पडली.

मर्यादीत लोकांची उपस्थिती

डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी भेटीचा अविस्मरणिय क्षण पाहण्यासाठी काल हजारोच्या संख्येने भाविकांची मंदिर परिसरात अलोट गर्दी होते. मात्र कालच्या पालखी भेटीचा सोहळा कोरोणामुळे मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत झाला.

कोरोनाचे संकट कायमचे दूर करण्याचे गार्‍हाणे..

हे भैरी देवा, सर्व कार्यक्रमामध्ये बाळ-गोपाळ, माणकरी, स्ट्रस्टी, आदी सर्व सामिल आहे. या सर्वांचे रक्षण कर. देशावर आलेले कोरोनाचे संकट कायमचे दूर करा. राखणदार रखवालदार सर्वांना बरं कर, असे साकडे श्री देव भैरी बुवाला घातले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT