shimgotsav mand tradition martond konkan sindhudurg 
कोकण

मातोंडमध्ये जपली जातेय मांड परंपरा 

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तळकोकणात शिमगोत्सव हा ठिकठिकाणी विविध रूढी परंपरांनी साजरा केला जातो. यातीलच एक परंपरा म्हणजेच मांड. वेंगुर्ले तालुक्‍यातील मातोंड गावात अजूनही तेवढ्याच उत्साहात ही मांड परंपरा जपली जातेय. यात वैशिष्ट्य म्हणजे गावात घरोघरी जाऊन माती पासून बनवलेले घुमट हे वाद्य गावातील नागरिकांना वर्षातून एकदा ऐकायला मिळते. 

तालुक्‍यातील मातोंड गाव हा विविध धार्मिक व सांस्कृतिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात शिमगोत्सव सुद्धा होळी पासून सात दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शिमगोत्सवातील एक वैशिष्ट्य म्हणजे मांड. हा मांड होळीपासून चौथ्या दिवशी गावात प्रत्येक घरोघरी फिरतो. यातील मुख्य आकर्षण म्हणजे घुमट हे वाद्य. मातीपासून बनवलेले हे घुमट वाद्य गावातील प्रत्येक घरी विविध गाण्यांच्या तालावर वाजवले जाते.

यामुळे एक वेगळेच वातावरण गावात पहावयास मिळते. गावातील प्रमुख परब गावकारांचे एक प्रतिनिधी यांच्यासहीत घाडी, मेस्त्री, मातोंडकर, नर्से, वराडकर, नाथ, जाधव आदी कुटुंबीय गावचे निशाण घेऊन या मांडमध्ये सहभागी होतात. मातोंड, पेंडुर गावाबरोबरच तुळस-कुंभारटेंब याठिकाणी हा मातोंड गावच्या मनाचा मांड जातो. होळीपासून सातव्या दिवशी धुळवडीने याची सांगता होते. 

नियम पाळून रूढी परंपरा 
कोरोनाचे सावट या शिमगोत्सवावर असल्याने हे मांडकरी शासनाचे सर्व नियम पाळून हा मांड घरोघरी फिरवत आहेत. सध्या लोप पावत असलेल्या या रूढी परंपरा अजूनही मातोंड गावात तेवढ्याच उत्साहात जपल्या जात आहेत. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT