कोकण

''नेत्यांविरोधात वक्तव्याला सेना स्टाईलने उत्तर देऊ''

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर, घाणेरड्या भाषेत ट्विटरवर पोस्ट करून बदनामी केली आहे. अशा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीवर त्वरित कायदेशीर कारवाई करा, अशी तक्रार शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आज केली. यापुढे शिवसेनेच्या नेत्यांविरोधात बदनामी करणारी वक्तव्य केली, तर आम्ही गप्प बसणार नाही. शिवसेना स्टाईल उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आणि शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी दिला.(shiv-sena-deputy-district-chief-bapu-mhap-warning-for-party-worker-kokan-news)

खासदार राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, नगरसेवक निमेश नायर आदी उपस्थित होते. ते म्हणाले, मुंबईतील एका व्यक्तीने मंत्री उदय सामंत यांची बदनामी होईल, अशी पोस्ट ट्विट केली आहे. चुकीचे आणि खोटे विधान करून संभ्रम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडियावर विनाकारण बदनामी करणाऱ्या मुंबईतील या व्यक्तीविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.

राज्यात आघाडीत असताना शिवसेनेच्या नेत्यांविरोधात राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी वारंवार टीका करीत आहेत. याबाबत आम्ही खासदार आणि पक्षप्रमुकांकडे तक्रार करणार आहे. पालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक आम्हाला सहकार्य करतात. मात्र काही स्वयंघोषित आणि काहीही संबंध नसणारे पदाधिकारी वक्तव्य करीत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यावरून वाद होतील. वारंवार सेनेविरोधात ओरड करणे योग्य नाही. आम्हालाही विचार करावा लागेल, यापुढे आमच्या नेत्यांविरोधात बोलल्यास आम्ही गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT