Shiv Sena join Sachin Paiav ispurli sindhudurg district
Shiv Sena join Sachin Paiav ispurli sindhudurg district 
कोकण

शिवसेनेचा भाजपला धक्का: अब होगी 'कांटे की टक्कर'

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाड(सिंधुदुर्ग) :  इन्सुली ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेने भाजपला धक्का दिला. भाजपचे माजी युवा मोर्चा सरचिटणीस माजी बुथ कमिटी अध्यक्ष सचिन पालव यांनी आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामुळे इन्सुली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना पॅनलमध्ये "कांटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. 

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी सचिन पालव यांच्यासह सखाराम पालव, संजय गावकर, सेजल गावकर, भीमसेन परब यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना शिवसेनेमध्ये सर्वांना योग्य मानसन्मान दिला जाईल, भविष्यात पालव यांच्यावर पक्षाची योग्य ती जबाबदारी दिली जाईल, असे सांगितले. 
राऊळ पुढे म्हणाले, "इन्सुली ग्रामपंचायत गत निवडणुकीमध्ये शिवसेनेची सत्ता आली होती. यावेळी मात्र महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा आणू. गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या जोरावर इन्सुलीमध्ये झालेली विकासकामे पाहता या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार आहेत.'' 

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच बबन ऊर्फ नारायण राणे म्हणाले, ""गावामध्ये ग्रामसभेमध्ये विरोधक नेहमी खोटारडा मुद्दा घेऊन पुढे येत होते; मात्र आता या खोटारड्या मुद्‌द्‌यांना खोडून काढण्यासाठी पालव यांच्यासारखी धडाडीची तोफ आम्हाला मिळाली आहे. त्याचा निश्‍चितच योग्य वापर करून घेऊ. गावात भाजपमधील अनेकजण शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. लवकरच त्यांचाही पक्ष प्रवेश घेण्यात येणार आहे. पाच वर्षांमध्ये केलेल्या पारदर्शक कारभारामुळे ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कारही मिळाला. यावेळीही महाविकास आघाडीची सत्ता अजून पारदर्शक कारभार करणार आहोत.'' 

साळगावकरांच्या भूमिकेचे स्वागत 
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. मुळात श्री. साळगावकर यांनी याआधीच यावर बोलणे गरजेचे होते; मात्र उशीराने का होईना त्यांनी घेतलेली भूमिकाही जनतेच्या हिताची ठरेल, असे तालुकाप्रमुख राऊळ यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू मुळीक, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT