Ramdas Kadam esakal
कोकण

Political News : अजित पवारांमुळेच शिवसेनेचे आमदार फुटले; रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांनीच शिवसेनेशी (Shiv Sena) गद्दारी केली. त्यांना आधी जाब विचारा.

सकाळ डिजिटल टीम

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या टीकेला शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे.

खेड : अजित पवार यांनीच शिवसेनेशी (Shiv Sena) गद्दारी केली. त्यांना आधी जाब विचारा, अशी टीका रामदास कदम यांनी केली. वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेच्या अनुषंगानं शिवसेना नेते रामदास कदम यांना विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या टीकेला शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले तर अजितदादांचे उपमुख्यमंत्रीपद गेले. त्यामुळेच थयथयाट सुरू आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले. राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी वाटप करून अजित पवार यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. वज्रमूठ सभेत टीका नाही तर थयथयाट केला. टीका करण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दाच आहे कुठे?

निवडणुका घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहोत; पण ज्या वेळी तुम्ही सत्तेत होता त्या वेळी निवडणुका का घेतल्या नाहीत, असा सवाल करत दुसऱ्याकडे एक बोट केले तर चार बोटे आपल्याकडे असतात याचे भान अजित पवार यांनी ठेवावे, असा सल्लाही कदम यांनी या वेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT