Shiv Sena officer and activists Join BJP in the presence of MLA Nitesh Rane 
कोकण

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा नीतेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील तळेरे येथील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आमदार नीतेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ओम गणेश निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यात राणे यांनी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. प्रवेशकर्त्यांमध्ये तळेरे ग्रामपंचायत सदस्या रिया भोगले यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तळेरे ग्रामपंचायतमधील रिया भोगले या एकमेव सदस्या भाजपमध्ये आल्याने येथील ग्रामपंचायत शंभर टक्‍के भाजपची झाली.

त्याचप्रमाणे पुढील सर्व निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजपच असेल असे श्री. राणे म्हणाले. बांधकाम सभापती बाळा जठार, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, माजी जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू , तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, खारेपाटण शक्तिकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, अण्णा कोदे आदी उपस्थित होते. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT