shiv sena tehsil head sandip sawant criticised ring bell movement of devendra fadanavis in ratnagiri 
कोकण

'घंटानाद मधला एक घंटा देवेंद्र फडणवीस यांना द्या' 

मुझफ्फर खान

चिपळूण : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने घंटानाद  सुरू केले आहे. परंतु त्यातील एक घंटा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना द्यावा आणि फडणवीस यांनी तो घंटा गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर वाजवून १५ लाख पैकी फक्त ५ लाख रुपये आणून मंदिरे आणि आमच्या पुजाऱ्यांना द्यावेत जेणे रून मंदिर व्यवस्था आणि पुजाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल आणि भाजपवर घंटानाद करण्याची वेळ देखील येणार नाही. आशा शब्दांत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी भाजपच्या घंटानाद आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

हातची सत्ता गेल्याने भाजप सैरभैर झाले आहे. राज्यात कोरोना महामारीमुळे किती बिकट परिस्थिती उभी राहिली आहे याचे भान भाजपला राहिलेले नाही.आशा कठीण प्रसंगात देखील त्यांना फक्त राजकारण सुचते हे दुर्दैवी असल्याचे संदीप सावंत यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोना महामारीचा मुकाबला करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना विरुद्ध दिलेल्या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्य सरकारने सुरुवाती पासून योग्य उपाययोजना राबवल्यामुळेच कोरोना आटोक्यात राहिला याचा अभ्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी करायला हवा असेही संदीप सावंत यांनी नमूद केले.

राज्यातील मंदिरे, मशीद, चर्च हे मुद्दामहून बंद ठेवलेले नाहीत हे भाजप आंदोलकांनी लक्षात घेतले पाहिजे. परिस्थितीच अशी निर्माण झाली की, ही धार्मिक स्थळे नाईलाजास्तव बंद ठेवावी लागली आहेत.आताच घाई गडबड करून धार्मिक स्थळे उघडी केली आणि गर्दी उसळली तर त्यावेळी लोकांच्या भावनेला आणि श्रद्धेला आवर घालणे कठीण होईल, हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे. उगाच लोकांच्या भावना भडकावून आपली राजकीय पोळी भाजण्याचे हे स्वार्थी राजकारण सामान्य जनता ओळखून आहे, असेही सावंत यांनी सुनावले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याबाबत टोला लगावताना संदीप सावंत म्हणाले, येथे घंटानाद करण्यापेक्षा जिल्हाध्यक्षांनी एक घंटा घेऊन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे द्यावी. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती घंटा गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर वाजवावी आणि जे १५ लाख येणार आहेत त्यातील फक्त ५ लाख रुपये आणून आमची मंदिरे आणि येथील आमचे पुजारी त्यांच्या हातात द्यावेत जेणेकरून व्यवस्था आणि पूजाऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. मंदिर उघडण्याची काळजी भाजपने करू नये. ती उघडण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यास पूर्ण सक्षम आहे. 

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT