Shiv Sena workers join BJP kolgaon sindhudurg district 
कोकण

कोलगावात शिवसेनेला खिंडार, शेकडो जण भाजपमध्ये

रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का देण्यात आला असून कोलगाव शिवसेनेत मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संदेशा संदेश वेंगुर्लेकर तसेच शिवसेनाशाखा प्रमुख विजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

तालुक्‍यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. तालुक्‍यात 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यात मुख्य करून कोलगाव व इन्सुली ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज सारंग यांनी शिवसेनेला धक्का देताना शिवसेनेच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संदेशा वेगुर्लेकर तसेच शिवसेना शाखा प्रमुख विजय सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घेतला आहे. 

यावेळी कोलगावचे माजी सरपंच राजन कुडतरकर, प्रभाकर राऊळ, सोसायटी चेअरमन चंदन धुरी, ग्रामपंचायत सदस्य संदिप हळदणकर, संतोष राऊळ, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष संदेश टेमकर, सुरेश दळवी, फ्रॅकी डान्टस, संजय पाटणकर आदी उपस्थित होते. एकूणच कोलगावातील या पक्ष प्रवेशामुळे गावातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून येत्या काही दिवसात अन्य राजकीय घडामोडी पाहायला मिळणार असल्याचीही चर्चा आहे. 

पुन्हा चुरशीचा सामना 
कोलगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शिवसेनापक्षाचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा याच्या नेतृत्वाखाली गटाचा गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला होता. त्यावेळी आताचे भाजपचे नेते महेश सारंग यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता; मात्र सद्यस्थितीत परिस्थिती बदलली असून पुन्हा एकदा याठिकाणी चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT