shivsena agitation oros konkan sindhudurg 
कोकण

राणेंच्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

विनोद दळवी

सिंधुदुर्गनगरी - माजी खासदार निलेश राणे यांच्या वक्तव्याचा शिवसेनेच्यावतीने निषेध करत आज त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जोड्या चपलांनी मारत "जोडा मारो' आंदोलन केले. मारहाण करण्याची भाषा करून जिल्ह्याची शंतात भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे, की खासदार विनायक राऊत यांना धमकी दिल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निलेश राणे यांचे हे वक्तव्य शांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांतता भंग करणारे आहे. या प्रकारचा सिंधुदुर्ग शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर 

ओरोस फाटा येथील खासदार राऊत यांचे संपर्क कार्यालयात आज शिवसेना पदाधिकारी एकत्र आले व राणे यांच्या विधानाचा निषेध केला. त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जोड्यांचा मार दिला. त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांची जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, विक्रांत सावंत, अतुल रावराणे, संदेश सावंत पटेल, नागेंद्र परब, संदेश पारकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दाभाडे यांना निवेदन सादर करण्यात आले. 

जिल्ह्याची शांतता बिघडण्याची चिन्हे 
सिंधुदुर्ग जिल्हा हा शांत जिल्हा आहे. खासदार राऊत यांचा अपमान होईल, असे वक्तव्य करून त्याबाबतचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याची शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्‍यता आहे. याला सर्वस्वी नीलेश राणे व त्यांचे कार्यकर्ते जबाबदार राहणार आहेत. खासदारांना धमकी देणाऱ्या राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेनेनंतर भाजपही आक्रमक 

सावंतवाडी - शिवसेनेने निलेश राणे यांच्या वक्तव्याविरोधात प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन केल्याच्या काही तासांतच सावंतवाडी शहरात पडसाद उमटले. येथील भाजपने खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून शहरात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा पालिका नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर दिलीप भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, परिणीता वर्तक, सौ. टोपले, बंटी पुरोहित व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी खासदार राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेने केलेल्या आंदोलनाचा तसेच आंदोलनात सहभागी असलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचाही निषेध यावेळी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. निलेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेने आंदोलन केले होते; मात्र त्याचे पडसाद काही तासातच सावंतवाडीमध्ये उमटल्याचे दिसून आले.

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT