shivsena Corporator press conference sawantwadi project issue
shivsena Corporator press conference sawantwadi project issue  
कोकण

मनमानी खपवून घेणार नाही, असे का म्हणतायत शिवसेना नगरसेवक? वाचा...

रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेची जागा खासगी ठेकेदारांच्या घशात घालू देणार नाही, अशी भूमिका आज पालिकेच्या शिवसनेच्या ज्येष्ठ नगरसेविका तथा गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी मांडत नगराध्यक्ष संजू परब यांनी जाहीर केलेल्या 100 कोटीच्या प्रोजेक्‍टला विरोध दर्शविला. कंटेनर थिएटरप्रमाणे या खासजी प्रोजेक्‍टबाबत नगराध्यक्ष मनमानी करत असून यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

येथील माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी लोबो यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबु कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, नगसेविका शुभांगी सुकी आदी उपस्थित होते. श्रीमती लोबो म्हणाल्या, ""नगराध्यक्ष पालिकेचा कारभार हाकताना अभ्यास करूनच संजू परब यांनी हाकावा. कुठलाही निर्णय घेताना तो कौन्सिलच्या ठरावाने सर्वानुमते होतो.

असे असताना कोणालाही कल्पना न देता व विश्‍वासात न घेता एकटे संजू परब सभागृहात भाजी मार्केटच्या जागेत खासगी तत्वावर शंभर कोटी रूपयाचा प्रोजेक्‍ट उभारण्याची घोषणा करतात. हा कौन्सिलचा एकप्रकारे अपमान आहे. मुळात परब हेच ठेकेदार असल्याने त्यांनी शहरातील पालिकेच्या जागेवर नजर ठेऊ नये. मुळात कोणत्या ठेकेदाराकडून परब हा प्रकल्प उभा करणार आहेत? यामागे नेमका कोणाचा हात आहे ?'' 
बाबु कुडतरकर म्हणाले, ""नगराध्यक्ष पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करताना एकही नगरसेवक त्यांच्यासोबत का नाही ? त्यावेळी सभागृहात कोण होते ? एवढी मोठी घोषणा करताना नगरसेवकांना सोडा मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा यांची कल्पना नाही हे चुकीचे आहे.'' 

चुकीच्या गोष्टीला समर्थन नाहीच 
श्रीमती लोबो म्हणाल्या, ""मार्केट आज ना उद्या उभे राहील; पण आलेले पाच कोटी रूपये तरी त्यांनी खर्चे केले पाहिजे होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत खासगी ठेकेदारांच्या ताब्यात पालिकेची जमिन देणार नाही. यासाठी आम्ही कौन्सिल सभेत जोरदार विरोध करणार असून जे नियमात आहे त्याला नेहमी पाठिंबा राहणार असुन चुकीच्या गोष्टीला कदापी समर्थन करणार नाही.'' 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी T20 जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT