Shivsena  esakal
कोकण

Uddhav Thackeray : "भाजपबद्दल मला आदर होता कारण..."; उद्धव ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

उद्धव ठाकरे यांची महाड इथं जाहीर सभा पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

महाड : उद्धव ठाकरे यांची महाड इथं आज जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर विविध मुद्द्यांवर सडकून टीका केली. पण पूर्वी शिवसेनेसोबत युतीत असलेल्या भाजपचं कौतुकही त्यांनी केलं. भाजपबद्दल मला आदर होता, अशा शब्दांत आपली 'मन की बात' त्यांनी यावेळी सांगितली. (ShivSena Mahad Rally I had respect for BJP because Uddhav Thackeray said Mann Ki Baat)

उद्धव ठाकरे म्हणाले, "पूर्वीचा भारतीय जनता पक्ष होता, ज्याच्याबद्दल मला खरंच आदर होता. कारण ती पिढी वेगळी होती, विचार होते त्यामध्ये, काहीतरी नैतिकता होती. पण आता देशभरातील सर्व भ्रष्ट तुमच्या नेत्यांनी एकत्र केलं म्हणून मी त्यांना सांगितलं की, बीजेपी म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी असं नामकरण करा"

माझ्या शिवसेनेचं तुम्ही नावं बदलायला गेलात त्यानंतर मी लावलं नावं उद्धव बाळासाहेब ठाकरे. तसं तुम्ही लावा भ्रष्ट जनता पार्टी. मेघालयात अमित शहा बोलले होते, देशातील सर्वात भ्रष्ट सरकार कोनराड संगमा यांचं आहे. पण निकाल लागले आणि देशातील सर्वात भ्रष्ट सरकारच्या मांडीला मांडी लावून पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गेले. तो भ्रष्टाचार तुम्हाला चालतो का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

आमच्या साध्यासुध्या माणसांवर तुम्ही ईडीच्या, सीबीआयच्या धाडी टाकता, वाट लावला. तिकडं हसन मुश्रीफ यांच्या पत्नीनं रस्त्यावर येऊन सांगितलं की, आता धाडी बस्स झाल्या, आता आम्हाला गोळ्या घालून ठार मारा. कुठे आहे तुमची नैतिकता? कुठे आहे हिंदुत्व? लालू प्रसाद यांची सूनेची गर्भवती असताना बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही चौकशी केली, हे तुमचं हिंदुत्व? किती जणांना तुम्ही तुरुंगात टाकणार? असा सवाल विचारताना ही हुकुमशाही वृत्ती संपली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT