Shivsena 
कोकण

शिवसेनेचे स्टार प्रचारक मुलासाठी अडकले मतदारसंघातच

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे स्टार प्रचारक व शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव योगेश कदम निवडणूक लढवीत असल्याने याच मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत.

संपूर्ण राज्यात दापोली विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून रामदास कदम यांनी मंत्रालयातील आपले वजन वापरून दापोली विधानसभा मतदारसंघात बाराशे कोटी रुपयांची विकास कामे गेल्या चार वर्षात मंजूर करून आणली आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांचा मुलगा योगेश कदम याला मतदारांनी निवडून द्यावे, अशी त्यांची साधी अपेक्षा आहे. मात्र, दापोली विधानसभा मतदारसंघात पंचवीस वर्ष प्रतिनिधित्व करत असलेले शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांचा पराभव 2014 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी केला. त्यानंतर या मतदारसंघात संजय कदम यांनी मुसंडी मारली व येथील जनतेला आपलेसे केले. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम याना सोपी वाटणारी ही निवडणूक आता काही सोपी राहिलेली नसून ती प्रतिस्पर्धी उमेदवार संजय कदम यांनी कठीण करून ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून बसावे लागले आहे.

एकेकाळी संपूर्ण राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराची राळ उडविणारे रामदास कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघात जखडून ठेवण्याचे काम राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT