Shivshahi driver beaten up in ghuhagar 
कोकण

Video : शिवशाही चालकाला केली मारहाण अन् पुढे झालं असं...

सकाळ वृत्तसेवा

गुहागर - अपघातानंतर खासगी गाडीतील प्रवाशांकडून शिवशाहीच्या चालकाला मारहाण झालेल्या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईसाठी गुहागर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी तीन तास काम बंद आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर रात्री साडेआठला गुहागर आगारातून एसटी प्रवास सुरळीत झाला. अपघातास जबाबदारी खासगी गाडीच्या चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. 

गुहागर आगारातून मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी (ता. २९) गुहागर-पूणे (एमएच ०९ एफएल ०३९०) जादा शिवशाही बस ३ वाजता गुहागरमधून सुटली. ती पोफळी येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोचली. त्याचवेळी चिपळूणकडून येणाऱ्या खासगी चारचाकी वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात दोन्ही गाड्या एकमेकाला घासल्या. खासगी गाडीत नाशिक येथुन आलेले ठेकेदार महावितरणमधील एका अधिकाऱ्याच्या निरोप समारंभाला पोफळी येथे आले होते. या प्रकारानंतर खासगी गाडीच्या चालकासह अन्य प्रवाशांनी शिवशाही चालक अमोल आण्णा पाटील यांना बसमधून खाली खेचून मारहाण केली. या मारहाणीत अमोल पाटील गंभीर जखमी झाले आणि ते बेशुद्ध पडले. त्यावेळी तिथे असलेल्या अन्य लोकांसह शिवशाहीचे वाहक आणि ग्रामस्थांनी चालक पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु त्यांची स्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना डेरवण येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. अपघाताची माहिती समजताच आगारप्रमुख राजेशिर्के हे घटनास्थळी पोचले.

<
>

आगारातील कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन 

खासगी चारचाकीचा चालक पोफळी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता; मात्र त्या गाडीतील अन्य प्रवासी कार्यक्रमासाठी निघुन गेल्याची माहिती समजल्यानंतर संतापलेल्या गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ५.३० नंतर काम बंद आंदोलन सुरु केले. गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांनी चालकासह मारहाण करणाऱ्यांनाही अटक झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच काम करताना आम्हाला सुरक्षा मिळाली पाहिजे, यासाठी 
काम बंद केले. 

आंदोलन साडेआठपर्यंत...

दरम्यान, हे आंदोलन साडेपाच ते साडेआठपर्यंत सुरू होते. गुहागर पोलिसांनी आगारात जाऊन या प्रकरणातील सर्वांना अटक केली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेत गाड्या सुरू झाल्या. तोपर्यंत गुहागरमधून एकही गाडी सोडण्यात आली नव्हती. या प्रकरणी खासगी गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात 
आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT