Shortage of Cashew Modak in Konkan sindhudurg 
कोकण

लाॅकडाउनमुळे व्यवसाय ठप्प, गणरायाच्या प्रमुख नैवेद्याचाच तुटवडा

राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोकणात गणरायांना काजू मोदकांचा नैवेद्य प्रामुख्याने दाखवला जातो; मात्र यंदा लॉकडाउनच्या कालावधीत काजू मोदक करणारे छोटे उद्योग बंद राहिले. त्यामुळे बाजारात आलेला काजू मोदक पहिल्या दोन दिवसांतच संपला आहे. याखेरीज आंबा आणि खवा मोदकांचाही तुटवडा बाजारपेठांमध्ये निर्माण झाला आहे. 

कणकवलीलगत असलेल्या गोपुरी आश्रमात तत्कालीन व्यवस्थापक अंकुश सावंत यांनी 2002 मध्ये काजू मोदकाची रेसिपी तयार केली. त्यानंतर जिल्हा आणि जिल्हाबाहेरील बचतगटांना काजू मोदकाचे प्रशिक्षण देण्यात आले. इतर मोदकांपेक्षा काजू मोदकाची चव वेगळी असल्याने सिंधुदुर्गसह राज्यात काजू मोदकाला मोठी मागणी निर्माण झाली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील छोट्या आणि घरगुती उद्योजकांनाही यानिमित्ताने रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. 

यंदा कोरोनामुळे मार्च महिन्यापासूनच लॉकडाउन सुरू झाले. यात छोट्या आणि घरगुती उद्योजकांची आर्थिक घडी विस्कटली. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ देखील शेती क्षेत्राकडे वळले. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आजही काजू मोदक करणारे अनेक घरगुती, छोटे उद्योग बंद राहिले आहेत. तर यंदा काजू प्रक्रिया उद्योगही बंद राहिले आहेत. तरीही काही उद्योजकांनी काजू मोदक प्रक्रिया उद्योग सुरू केले; मात्र बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत राहिली.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन-तीन दिवसांतच काजू मोदकाचा साठा संपुष्टात आला. काजू मोदक नसल्याने ग्राहकांकडून आंबा आणि खव्याच्या मोदकांची मागणी वाढली होती. यात गुजरात तसेच अन्य भागातून खव्याचा पुरवठा देखील आवश्‍यक त्या प्रमाणात होत नसल्याने या मोदकांचाही तुटवडा बाजारपेठेत निर्माण होत असल्याची माहिती मोदक विक्रेते व किराणा व्यावसायिक प्रथमेश चव्हाण यांनी दिली. 

ठाणेतील उद्योगांमधून चॉकलेट मोदक येथील बाजारपेठांत येतात; पण लॉकडाउनमुळे तेथील कारखाने बंद आहेत. तर फॅक्‍टऱ्यांमध्ये कामगार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे बाजारपेठांत काजू, आंबा, खवा, चॉकलेट आदी प्रकारचा मोदक कमी आहे. कोरोनामुळे कमी प्रमाणात ऑर्डर होती. त्यामुळे बाजारात मोदकांची टंचाई आहे.'' 
- राजन पारकर, व्यापारी कणकवली 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून मओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

महाठग सापडला! रत्नागिरीतील तरुण मुंबईत आला, जीवनसाथी ॲपवर अविवाहित ‘पीएसआय’ असल्याची नोंदणी केली, ५० ते ६० मुला-मुलींशी संपर्क, फोनवर बोलायचा अन्‌...

Latest Marathi News Live Update: पोलिसाची गाडी बेकाबू, प्रवाशी रिक्षासह दोन दुचाकींना उडवले

SCROLL FOR NEXT