Sighting of rare seahorse in Kalinjar Rich and rare marine life raigad
Sighting of rare seahorse in Kalinjar Rich and rare marine life raigad Sakal
कोकण

Raigad News : काळिंजेच्या खाडीत दुर्मिळ समुद्री घोड्याचे दर्शन; समृद्ध व दुर्मिळ सागरी जीवांचा वावर

अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा

पाली : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मिळ समुद्री घोड्याचे दर्शन झाले आहे. येथील मच्छीमारांना मंगळवारी (ता.23) खाडीत मासेमारी करतेवेळी हा जीव जाळ्यात सापडला. त्यांनी याला जाळ्यातून बाहेर काढून खाडीत पुन्हा सोडले. यानिमित्ताने काळिंजेच्या खाडीचे जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

मंगळवारी (ता.23) सकाळी दहा वाजता काळींजे येथील मच्छीमार अनीस फणसोपकर खाडीत मासेमारी करत असताना त्यांना जाळ्यात हा समुद्री घोडा आढळला. खाडीत कोळंबी पकडण्यासाठी पाग टाकलेला असताना, त्या जाळ्यात नारंगी रंगाचा समुद्री घोडा फणसोपकर यांना आढळला.

त्यांनी या समुद्री घोड्याला जाळ्याबाहेर काढले आणि याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांना दिली. त्यांनी या समुद्री घोड्याची पाहणी करुन फणसोपकर आणि विक्रांत गोगरकर यांच्या मदतीने पुन्हा त्याला खाडीत सोडले.

श्रीवर्धन तालुक्यापासून १३ किमी अंतरावरील काळिंजे गावामध्ये १९० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरले आहे. याठिकाणी खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती कांदळवनांचे दाट आच्छादन आहे.

या बेटावरच वालूकामय चिखलाच्या मैदानाचा एक मोठा भाग पसरलेला आहे. काळिंजे गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी आहे. काळिंजे खाडीत कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन सुरू आहे. गावातील स्थानिक लोक कांदळवन कक्षाच्या मदतीने निसर्ग पर्यटन करत आहेत.

या खाडीत कांदळवनांच्या ११ प्रजाती आढळत असून पक्ष्यांच्या सुमारे ८० हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. तसेच पाणमांजरांचा अधिवास या परिसरात पाहावयास मिळतो. महत्त्वाचे म्हणजे चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटाच्या मध्यभागी गोड्या पाण्याच्या विहिरी असून तिथे कोल्हे व रानडुकरांचे अस्तिव आहे. त्यामुळे येथील जैवविविधता लक्षात घेऊनच निसर्ग पर्यटनाला सुरुवात केली आहे.

संरक्षित जीव

या समुद्री घोड्याची लांबी १३ सेमी होती. समुद्री घोडा हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असून त्याला वाघाएवढे संरक्षण देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT