simple marriage lockdown positive impact in chiplun 
कोकण

मोठ्या खर्चाला छेद : त्यांनी घेतला हा निर्णय़ अन् असा केला विवाह....

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने वालोपे येथे रविवारी (ता. 10) सामाजिक नियमांचे पालन करीत अनोखा विवाह सोहळा पार पडला. चिपळूण पालिकेचे बांधकाम विभागाचे कर्मचारी प्रवीण सिद्धार्थ जाधव आणि मुसाड येथील दिशा सुनील सावंत यांनी नियोजित विवाह मोजक्याच नातेवाईकांसह थाटात केला. विशेष म्हणजे या नववधुवरांनी सामाजिक बांधिलकी जपत वालोपेतील 35 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. मोठ्या खर्चाला छेद देत तो खर्च सामाजिक कार्यासाठी वापरल्याने अनेकांनी या नववधूवरांचे कौतुक केले. 

नववधुवरांनी 35 कुटुंबांना दिल्या जीवनावश्यक वस्तू  

कोरोना संकटामुळे सर्वच नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे. प्रवीण आणि दिशा यांचा विवाह रविवारी (ता. 10) निश्‍चित झाला होता. मात्र कोरोनाचे संकट अधिकच गंभीर बनल्याने लॉकडाऊन वाढविण्यात आले. त्यामुळे या वधुवरांनी आपल्या कुटुंबीयांच्या संमतीने शासनाच्या आदेशाचे पालन करीत मोजक्याच नातेवाईकांसह विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मोठा खर्च टाळून 35 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. विशेष म्हणजे विवाह सोहळ्याला येऊ न शकलेल्या नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलवर हा सोहळा पाहिला.

पालिका कर्मचार्‍याचा विवाह साधेपणाने 

सहभागी झालेल्या प्रत्येकाने तोंडावर मास्क बांधून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला. या वेळी वालोपेचे पोलिसपाटील बाळकृष्ण कदम, शाखेचे अध्यक्ष शांताराम जाधव, हरिश्‍चंद्र जाधव, सुनील मोहिते, अमोल जाधव, दिपेश जाधव,  पत्रकार शैलेश जाधव, सुभाष जाधव, विणा सावंत, प्रियंका जाधव, अरुणा जाधव आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे विविध स्तरातील घटकांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन नसता तरा विवाहाला खर्च अधिक झाला असता. त्यामुळे वाचलेला खर्च गरजू लोकांसाठी करण्याचा निर्णय आम्ही कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार वाडीतील सर्व 35 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. 
---प्रवीण जाधव, वालोपे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT