sindhudurga  sakal
कोकण

केंद्राकडून पर्यटनासाठी सिंधुदुर्ग दत्तक

पालकमंत्री; आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : राज्याच्या मागणीनुसार केंद्राने पर्यटन विकसित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील मुख्य शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दतात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, राजेंद्र पराडकर, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, "देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाचं बलिदान दिले. देशाची एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमता कायम राखण्यासाठी अनेक शूर सैनिकांनी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व वीरपुत्रांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या सोहळ्यासाठी आज इथे आवर्जून उपस्थित सर्व सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, सैन्यदलातील, तसेच राज्याच्या पोलीस दलातील आजी माजी अधिकारी, कर्मचारी, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पत्रकारिता, समाजकारण आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्व बंधू-भगिनींचे स्वागत करतो.

देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही परंपरा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सदैव क्रियाशील राहावे. एकता आणि बंधुता यांचा संदेश देणारी आपली लोकशाही ही जगात सर्वोत्कृष्ट अशीच आहे. अशी ही लोकशाही चिरंतर टिकावी यासाठीही आपण सजग रहावे. आजच्या या घडीला देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क, सॅनिटायझर आणि समाजिक अंतराचे पालन करावे. लसीकरणही करून घ्यावे. कोरोनावर लवकरच आपण निश्चितपणे अंतिम विजय मिळवू. त्यासाठी आपणाला नियमांचे पालन करून संयमाने लढायचे आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘राज्याने केंद्राकडे पाच जिल्ह्यांबाबत मागणी केली होती. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन विकसीत करण्यासाठी केंद्राने दत्तक जिल्हा घोषीत केला आहे. त्याचबरोबर यवतमाळ हा जिल्हा शिक्षणासाठी घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा या पूर्वीच पर्यटन जिल्हा जाहीर झाला आहे. पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी निश्चितच चांगल्या पायाभूत सुविधा केल्या जातील. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्याने कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. या धोरणामध्ये वीज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात 66 टक्क्यांपर्यंत सूट देऊन त्यांना वीज बील कोरे करण्याची संधी उपलब्ध केली आहे. 31 मार्च 2022 पूर्वी 66 टक्क्यांपर्यंत सवलत घेवून वीज बील कोरे करण्याची ही शेवटची संधी आहे. या योजनेत कृषीपंप ग्राहकांचा सहभाग महत्वाचा आहे. वीज बिलाच्या वसूल झालेल्या रकमेतून 33 टक्के ग्रामपंचायत व 33 टक्के जिल्हा पातळीवर हा निधी पायाभूत सुविधेसाठी वापर करता येणार आहे. तरी कृषीपंप ग्राहकांनी या धोरणाचा लाभ घेऊन वीज बील कोरे करावे."

गोवा महाविद्यालयास प्रशस्तीपत्र

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय व गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांना पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेत अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर, सर्व सभापती, विषय समिती प्रमुख व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT