vaccination  sakal
कोकण

सिंधुदुर्गात मुलांच्या लसीकरणाला वेग

डॉ. संदेश कांबळे; १७ हजार ६०३ जणांचे लसीकरण पूर्ण

राजेश नागरे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून, आजअखेर एकूण २५ हजार १९३ मुलांपैकी १७ हजार ६०३ मुलांचे (७० टक्के) लसीकरण पूर्ण केले आहे; तर १५ वर्षांवरील नागरिकांचे ९७ टक्के लसीकरण पूर्ण केले असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी आज दिली.

जिल्ह्यात १८ वर्षांवरील ९८ टक्के नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे; तर ८८ टक्के नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांचेही लसीकरण ९८ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यासाठी १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोर्बोवॅक्स लसीचे ३० हजार डोस उपलब्ध झाले असून, २१ मार्चपासून या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. १२ ते १४ वयोगटातील २५ हजार १९३ मुले आहेत.

या मुलांना शाळेत जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. १२ ते १४ वयोगटातील एकूण २५ हजार १९३ लाभार्थी मुलांपैकी आजपर्यंत १७ हजार ६०३ मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आजपर्यंत ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के मुलांचे लसीकरण येत्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येईल, असे या वेळी डॉ. कांबळे यांनी सांगितले.

जिल्ह्यात सर्वात प्रथम ४५ वर्षांवरील नागरिकांना कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर १८ वर्षांवरील ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात आली. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. या सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण ९७ टक्के पूर्ण झाले आहे. आता १२ ते १४ वयोगटातील २५ हजार १९३ मुलांचे लसीकरण सुरू असून, अद्यापही ३० मुलांचे लसीकरण शिल्लक आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.

खबरदारी आवश्यक

जिल्हा ३१ मार्चला कोरोनामुक्त झाला आहे. त्यानंतर गेल्या १२ दिवसांत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही, ही समाधानाची बाब असली, तरी खबरदारी घ्यायला हवी. त्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे.

अद्यापही ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी व भविष्यातील धोका टाळावा. सद्यस्थितीत वातावरणातील बदल आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे तापसरीची साथ येऊ शकते. तरी घाबरून न जाता तत्काळ शासकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावेत.

- डॉ. संदेश कांबळे,जिल्हा लसीकरण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

Sim Card Rules : रिचार्ज न केल्यास सिमकार्ड किती दिवसांनी बंद होतं? नवा नियम आहे खूपच फायद्याचा

SCROLL FOR NEXT