Sindhudurg Corona fight pattern kokan marathi news 
कोकण

सिंधुदुर्गात क्वारंटाईन टाळाल तर ठरेल गुन्हा....

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी :  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाचा सामना करण्यासाठी चांगले काम करत आहे. सध्या सुरू असलेले काम असेच सुरू ठेवूया आणि कोरोनाशी लढण्याचा सिंधुदुर्ग पॅटर्न तयार करूया असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी  आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना विषयी केलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री श्री सामंत यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
 यावेळी आमदार वैभव नाईक, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री यांनी अशा​ दिल्या सूचना
 कोरोनाच्या चाचणीसाठी रक्ताचे नमुने घतले जात नसल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाच्या चाचणीसाठी घशातील द्रवाचा स्वॅब घेतला जातो. याविषयी नागरिकांनी जागरुकता बाळगावी. तसेच रक्ताचे नमुने घेतले जातात हा गैरसमज बाळगू नये. नागरिकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे व सहकार्य करावे. कोरोनाचा सामना कराताना आरोग्य कर्मचाऱ्यांनीही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ज्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांनी घरात किंवा त्यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे तिथेच रहावे.

जर क्वारंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती बाहेर फिरताना आढळली तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, रेडी बंदरावर कोणतेही जहाज येणार नाही याविषयी सक्त सूचना पोर्टला द्या. क्वारंटाईन कॅम्पच्या ठिकाणी महसूल, आरोग्य व पोलिस यंत्रणेचे अधिकारी यांना तैनात करावे. आरोग्य यंत्रणेने त्यांना लागणारे सर्व साहित्य खरेदी करावे. औषधांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. माकडतापाच्या निदानासाठी जिल्ह्यात सुरू करावयाची विषाणू तपासणी प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित करावी. माकडतापाने एकही रुग्ण दगावणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.

सिमेवर क्वारंटाईन करण्याच्या सोयी
 कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड म्हणाले की, जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याच्या सोयी जिल्ह्याच्या सिमेवर उभाराव्यात, या सुविधा उत्तम प्रकारच्या असाव्यात. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी होऊन याविषयी यंत्रणांनी सतर्क रहावे.बैठकीपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनासाठी निर्माण करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी केली. कक्षामध्ये सध्या कोणकोणत्या सुविधा उभारल्या आहेत याची माहिती घेतली. यावेळी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर आदी उपस्थित होते. यावेळी कोवीड 19 कक्षाचे प्रमुख अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी कक्षाविषयीची माहिती दिली.

 हेही वाचा-Coronavirus : परगावाहून येणाऱ्या प्रत्येकावर राहणार आता वाॅच.....
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले कौतुक
जगभरात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पाडणाऱ्या जयेश गावडे व त्यांच्या नववधू सौ. पुनम यांचे जिल्हाधिकारी यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत. त्यांना पुढील आयुष्यास शुभेच्छा दिल्या आहेत. श्री व सौ गावडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले आहे.
·         .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार धाकट्या सुनेची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

PMC Election : प्रचारासाठी मैदान, चौक वापरायचा असेल तर पैसे मोजा; पुणे महापालिकेचे निवडणूक शुल्क जाहीर!

Thane Politics: कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम, पोटेंच्या आरोपांना रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT