fast sakal
कोकण

सिंधुदुर्गनगरीत तब्बल १२ उपोषणे

विविध मागण्या; जिल्हा प्रशासनाकडून दखल

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी: महाराष्ट्रदिनी जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरी येथे जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल १२ उपोषणे छेडली. पालकमंत्री उदय सामंत यांनी दखल घेत मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने अनेक उपोषणे मागे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

काळसे-धनगरवाडी

काळसे-धनगरवाडी (ता.मालवण) ग्रामस्थ गेली १० वर्षे धनगरवाडीसाठी पक्का रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. दखल घेतली नसल्याने उपोषण केले.

वायंगणीतील रस्ताकाम

वायंगणी (ता.वेंगुर्ले) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय दरम्यान रस्त्याचे काम नियमबाह्य पद्धतीने होत असल्याने योगेश तांडेल यांनी उपोषण छेडले. शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे व नियमबाह्य पद्धतीने मिळविलेल्या सीआरझेडच्या मान्यतेला तसेच एक कोटी ७२ लाखांचा निधी दिला त्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

वेंगुर्लेतून विविध मागण्या

वेंगुर्ले तालुक्यातील खानोली धनगरवाडी येथील किशोर वरक यांनी ग्रामपंचायत मालकीची विहीर बेकायदेशीररीत्या बुजवणारे जमीन मालक व त्यास साथ देणारे सरपंच उपसरपंच व तलाठ्यांवर गुन्हा दाखल करावा यासाठी उपोषण छेडले. आडेली-खुटवळवाडी येथील जनार्दन रुक्मांगद कुडाळकर यांनी जिलेटिन स्फोटक वापर करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, याकडे लक्ष वेधले. नीलेश वराडकर यांनी गटार बांधणे कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी केली. होडावडा येथील आनंदी जोशी यांनी पारंपारिक पाणंदबाबत उपोषण केले. रेडीतील निवृत्त पोलिस कर्मचारी रमेश राणे यांनी उपोषण केले.

गौणखनिज प्रकरणी उपोषण

वसुलीसाठी प्रशासन वेळकाढू भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ माजगाव-चिपटेवाडी येथील बाळू निचम यांनी उपोषण केले.

दंड वसुलीची मागणी

बेकायदेशीर गौण खनिजाची दंड वसुली करा, या मागणीसाठी सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील संदीप मांजरेकर यांनी उपोषण केले.

मडुरावासीयांचा एल्गार

सातार्डा येथील एका कंपनीने जमीन खरेदी केली आहे. या प्रकल्पामध्ये मडुरा दशक्रोशीतील तरुणांना कंपनीत नोकरी मिळावी व दशक्रोशीतील नागरिकांवर झालेला अन्याय दूर करावा यासाठी जगन्नाथ पंडित, (अध्यक्ष संघर्ष समिती, मडुरा) वसंत विठ्ठल धुरी, (माजी सरपंच, सातोसे) समीर गावडे (सरपंच, निगुडे) श्रीकृष्ण भोगले (शिवसेना शाखाप्रमुख, मडुरा) गुरुदास गवंडे (उपसरपंच, निगुडे) विश्वनाथ राणे (सामाजिक कार्यकर्ते, कास) यांनी उपोषण केले.

महसूल विरोधात उपोषण

महसूल विभागाने केलेल्या अन्यायाविरोधात सेवानिवृत्त आयकर निरीक्षक श्रीमती वसुधा गोवेकर यांनी दाद मागितली.

ओसरगावासीयांचे उपोषण

ओसरगाव-कांनसळीवाडी (ता.कणकवली) येथील स्मशानशेडकडे जाण्याचा रस्ता मिळण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. श्री विठ्ठल रखुमाई विकास मंडळ कानसळीवाडीतील दीपक आळवे, सहदेव सावंत आदींनी उपोषण केले.

गाळ उपशाची मागणी

दोडामार्ग तालुक्यातील कॅनलचे शेतीसाठी पाणी व तिलारी खाडी नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत तेरवण मेढे ग्रामपंचायतीचे सदस्य मायकल लोबो यांनी उपोषण केले. राष्ट्रवादीने वेधले लक्षमुंबई-गोवा महामार्गावरील इमारतीचा भूसंपादन प्रक्रियेशी संबंध नसताना संबंधित अधिकारी वर्गाने भूसंपादन प्रक्रियेत ही इमारत भूसंपादीत दाखवून कोट्यवधी रुपये शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, प्रांतीक संघटक सचिव काका कुडाळकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर यांनी उपोषण

छेडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT