Sindhudurg district asha workers facing problems  
कोकण

आमच्याकडे माहिती मागणाऱ्या तुम्ही कोण?

एकनाथ पवार : सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : आमच्याकडे कसली माहिती मागताय? आम्ही कसलीच माहिती देणार नाही आणि कुठे जाणार नाही? माहिती मागणाऱ्या तुम्ही कोण, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला कोरोना झालाय का?... इतर जिल्ह्यातून आलेल्या लोकांच्या या त्रासिक प्रश्‍नांनी सध्या स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्रचंड दडपण आले आहे. एकीकडे कोरोनासारख्या न दिसणाऱ्या शत्रूचा सामना करायचा आहे, तर दुसरीकडे लोकांच्या दारात जाऊन त्यांची बोलणी निमुटपणे ऐकायची, अशी गत सध्या त्यांची झाली आहे. लोक गावातीलच असल्यामुळे कर्मचारी त्यांची तक्रारही करीत नाहीत. 

कोरोनाच्या लढ्यात अधिकारी वर्गाप्रमाणेच किंबहुना अधिक संघर्षात्मक काम गावागावांतील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका करीत आहेत. अतिशय तुटपुंजे मानधन असले तरी हा वर्ग एक सामाजिक बांधिलकीतून कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गावातील प्रत्येक वाडीवस्तीतील घराघरांत जाऊन सर्वेक्षण करणे, कुणाला सर्दी, ताप, खोकला आहे का याची विचारणा करणे, मुंबई, पुणे किंवा परजिल्हा, परराज्यातून गावात कुणी आले का, याची विचारपूस करून त्यातील महत्त्वाची माहिती वरिष्ठ कार्यालयांना देणे, असे कामाचे स्वरूप आहे. त्यामुळे अजूनही जिल्ह्यात कोरोनापासून संरक्षित आहे. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लोक मात्र अनेकदा उद्धट वाटावीत, अशा प्रश्‍नांची सरबत्ती करीत आहेत. बाहेरून आलेल्यांचे मूळ गाव तेच असते. त्यामुळे कर्मचारी प्रत्युत्तर देत नाहीत. आपल्याच गावातील आहेत म्हणून वरिष्ठांकडे तक्रार करायचेही टाळतात. 

कोरोनाची अनामिक भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे. घरात लहान लहान मुले असतानाही अनेक कर्मचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करीत आहेत. कोरोनापासून चार कोस दूर राहावे, असे शासन प्रत्येक नागरिकांना सांगत आहे; मात्र ही मुभा या कर्मचाऱ्यांना नाही. ते सर्व जबाबदारी ओळखून काम करीत आहे; परंतु लोकांच्या वागणुकीमुळे या कर्मचाऱ्यांची ढोलकी झाली आहे. परिणामी ते दडपणाखाली आहेत. तरीही ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 

"कोरोनाच्या लढाईत आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. प्रशासनातील महत्त्वाचे घटक म्हणून त्या काम करीत आहेत. माहिती मागितली म्हणून त्यांना कुणीतरी काही बोलत असेल तर ते चुकीचे आहे; परंतु तशा प्रकारची तक्रारही कुणी केलेली नाही.'' 
- डॉ. उमेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal Shaktipeeth Controversy : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीत मोठा घोळ? शेकडो झाडांसह विहिरी गायब झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; 451 आक्षेप दाखल

Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना साखर आयुक्त करा!' माढ्यात दुग्धाभिषेक आंदोलन, शेतकरी-कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना मोठा धक्का! श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी घसरण; अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींना मागे टाकणारा कोण?

Satej Patil statement : गोकुळचं राजकारण! सतेज पाटलांनी महाडिक काका पुतण्यांचा घेतला समाचार; ‘भावकीनं लक्षात ठेवावं’

Gulabo-Sitabo: देवरानी-जेठानीचे भांडण अन् १८५७ च्या क्रांतीत देशप्रेमाची ठिणगी! गुलाबो-सिताबो पपेट शोचे काय आहे बच्चन कनेक्शन?

SCROLL FOR NEXT