narayan rane sakal
कोकण

सिंधुदुर्ग झालं आता राज्याकडे लक्ष - नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचं पॅनल विजयी

निनाद कुलकर्णी

सिंधुदुर्गच्या जिल्हा बँक निवडणुकीत आज भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनलने १९ पैकी ११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मेहनतीला यश मिळालं असून, या विजयाचं श्रेय जनता, भाजपचे कार्यकर्ते यांना जातं अशा भावना नारायण राणेंनी (Narayan Rane) व्यक्त केल्या आहेत. तसेच या बँकेवर आपली नाही तर भाजपची (BJP) सत्ता आल्याचं राणेंनी सांगितलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर आपलं लक्ष राज्याकडे असेल असं राणेंनी सांगितलं. राज्याला मुख्यमंत्री नसून, राज्य अधोगतीच्या मार्गावर असल्याचंही ते म्हणाले. तसंच राज्याला आता भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे असल्याचं देखील ते म्हणाले. जिल्हा बँक ही स्थानिक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांच्यासाठीच काम केलं जाईल. तसेच बारामतीसाठी आता या बँकेतून कर्ज दिलं जाणार नाही असंही नारायण राणे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले तरी ते जिंकू शकले, ज्यांचे चेहरे सुद्धा पाहावत नाहीत, त्यांना लोक संधी देणार नाही असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्षांसह दिग्गजांचा पराभव झाला असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा प्रतिष्ठेचा गड नारायण राणे (Narayan Rane) यांनी जिंकला. यंदाची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणुकी इतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीपेक्षा वेगळी होती. संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेला हल्ला, नितेश राणे (Nitesh Rane)यांच्यावरील अटकसत्र, राणेंना कोर्टाने बेल नाकारली या सर्व घटनेवरून या निवडणुकीला वेगळे वळण लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT