Sindhudurg district Home quarantine stamp blisters on the hands 
कोकण

सावधान : होम क्वारंटाईन शिक्क्यामुळे हाताला फोड

सकाळ वृत्तसेवा

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्‍यातील तळेबाजार येथील दोन युवतींना होम क्वारंटाईन शिक्का मारल्यानंतर त्यांच्या हाताला इन्फेक्‍शन झाले. त्यांच्या हातावर फोड आले आहेत. त्या युवतींवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी दिली. 

मुंबई, पुणे आदी प्रमुख शहरांमधून नागरिक गावागावांत येत आहेत. खारेपाटण येथील नाक्यावर तर सुमारे दोन - दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा आहेत. हे तपासणी नाके येणाऱ्या चाकरमान्यांमुळे भरून वहात आहेत. आरोग्य तपासणी आणि कागदपत्रांच्या तपासणीत सुमारे सहा-सहा तास लागत आहेत. 

खारेपाटण येथील सीमा, तसेच आंबेरी येथील तपासणी नाक्‍यावर होम क्वारंटाईन शिक्का उमटवण्यात येतो. मात्र, हा शिक्का काही जणांसाठी धोकादायक ठरल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे शिक्का मारलेल्या तळेबाजार येथील दोन युवतींच्या हाताला फोड येऊन हात काळे पडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत आरोग्य विभागाशी याबाबत संपर्क साधल्यानंतर

देवगड तालुक्‍यात चार ते पाच जणांबाबत असे प्रकार घडले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शाईची ऍलर्जी असल्याने असे घडले आहे. 

डॉ. संतोष कोंडके, तालुका आरोग्य अधिकारी, देवगड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT